- विधवा विवाहासाठी समाज घटकांनी पुढाकार घ्यावा– पंडितराव देशमुख
विधवा भगिनी स्वतःहून पुनर्विवाहाचा विचार करत नाही परंतु अशा भगिनींना सन्मान जनक जीवन जगता यावे त्यांचे आयुष्य प्रकाशमान व्हावे यासाठी आई वडील सासू-सासरे व इतर समाज घटकांनी पुढे यावे असे आवाहन श्रीराम नागरी पतसंस्था अध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले आहे. चिखली येथे 3 जानेवारी रोजी विधवा परितक्त्या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने ते बोलत होते
विधवा महिलांना जीवनसाथी मिळावा, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व त्यांच्याकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन बदलावा यासाठी प्राध्यापक डी एस लहाने आणि शिवशाही परिवार व मानस फाउंडेशन ने बुलडाणा येथे विधवा परिषद व विविध उपक्रम राबविले आहे. या उपक्रमाची सर्वत्र दखल घेतल्या गेली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी विधवांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी खस्ता खाल्ल्या या घटनेला आता 100 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यानंतर बुलढाण्यात प्रा. लहाने यांनी विधवा परिषद घेतली. यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी विधवा सन्मानासाठी लोक पुढे येऊ लागले आहे. चिखली येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे अवचित्य साधून श्रीराम नागरी पतसंस्था यांनी 3 जानेवारी रोजी विधवा परिचय मेळाव्याचे आयोजन जिजाऊ इंग्लिश स्कूल, राऊत वाडी येथे केले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याच आवाहन संस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले आहे.
अभिनव संकल्पना– एसपी कडासने
विधवा सन्मानासाठी बुलढाण्यातून पुढाकार घेतला जातो यावर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रा. डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर यांनी पोलीस अधीक्षक यांना विधवा परिचय मेळाव्याबाबत अवगत केले. ही संकल्पना ऐकूण पोलीस अधीक्षक कडासने भारावले. ही कल्पनाच अभिनव असल्याचे ते म्हणाले. चिखली येथील मेळाव्याचे ते प्रमुख अतिथी आहे.