आयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त बुलढाण्यात उत्सव बुलढाणा विधानसभेत एकाच वेळी सगळीकडे होणार कार्यक्रम

आयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त बुलढाण्यात उत्सव

बुलढाणा विधानसभेत एकाच वेळी सगळीकडे होणार कार्यक्रम

बुलढाणा

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रम उत्साहात पार पाडावा असे आवाहन आ संजय गायकवाड यांनी केले आहे

आयोध्या येथे भगवान श्रीराम यांचे मंदिर उभारण्यात यावे यासाठी अनेक वर्षापासून श्री राम भक्तांनी लढा दिला अनेकांचे प्राण गेले अखेर या विषयाला उच्च न्यायालयाच्या आदेशाने पूर्णविराम मिळाला त्यानंतर करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील सर्वात सुंदर असे मंदिर अयोध्या येथे निर्माण करण्यात आले 22 जानेवारी रोजी त्या ठिकाणी भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ही घटना म्हणजे संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची घटना आहे
या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात एकाचवेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम बुलढाणा येथील जुना गाव, राममंदिर, सागवन परिसर, सुंदरखेड परिसर तसेच ग्रामीण भागात एकाचवेळी ढोल ताशाच्या गजरात महापूजा आरती अभिषेक अभिषेक कार्यक्रम केले जाणार आहे या उत्सवात परिसरातील जास्त जास्त नागरिकांनी वारकरी टाळकरी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे

बाक्स…
नेत्रदिपक उत्सव व्हावा …
भगवान श्री राम मंदिराच्या लोकार्पण निमित्त तसेच भक्तांच्या श्रद्धेपोटी शहर व गावातील सर्वांनी त्या दिवशी आपल्या घरासमोर सडा सारवन तसेच रांगोळी काढून या उत्सवात सहभागी व्हावे सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत गावागावातील श्रीराम मंदिरात महाआरती, अभिषेक करावा, हा कार्यक्रम नेत्र दीपक व्हावा

आमदार संजय गायकवाड बुलढाणा

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *