तुकाराम आश्रय वृद्धाश्रम ला चिखली वकील संघांचे गादी भेट तर गवई परिवाराची आर्थिक मदत*

*तुकाराम आश्रय वृद्धाश्रम ला चिखली वकील संघांचे गादी भेट तर गवई परिवाराची आर्थिक मदत*

 

 

चिखली :- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे चिखली वकील संघाच्या वतीने गादी बेडशीट व ब्ल्याॅंकेट दिले भेट तर सुधाकर बाबुराव गवई बाराई पाचला ता मेहकर येथील रहिवाशी तसेच किनगावं राजा पोलीस स्टेशनं चे कर्मचारी यांनी आपली आई दिवंगत वच्छालाबाई बाबुराव गवई यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमाच्या बांधकाम करिता रुपये पाच हजार आर्थिक मदत दिली.
सविस्तर असे कि गेल्या एक ते दिड वर्षा पासून तालुक्यातील भोकर येथे बेवारस बेघर निराधार असे वयोवृद्ध आजी आजोबा यांची निःस्वार्थ पणे मोफत सेवा सुरु आहे. येथील वृद्धाना सर्व जीवनावश्यक जसे राहणे, जेवण, ओषधी, कपडे, दवाखाना इतर सर्व सुविधा वृद्धाश्रमात चे संचालक प्रशांत डोंगरदिवे व संचालिका सौं रुपाली डोंगरदिवे हे दोघे दांपत्य हे करीत आहे. यांची दखल चिखली वकील संघाने घेत वृद्धाश्रमास गादी, बेडशीट व ब्ल्याॅंकेट भेट दिले तर वृद्धाश्रमाच्या बांधकाम साठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन सामाजिक माध्यमातून करण्यात आली होती या आवाहन ला प्रतिसाद देत सुधाकर बाबुराव गवई यांनी वृद्धाश्रमात रुपये पाच हजार आर्थिक मदत दिली.
यावेळी चिखली वकील संघांचे अध्यक्ष ऍड सागर सोनाळकर, ऍड अनिल कऱ्हाडे, ऍड रवींद्र माळोदे, वाहतूक निरीक्षक सागर परदेसी, पोलीस हे कॉ सुधाकर गवई, बाबुराव गवई, सौं कांताबाई रमेश घेवंदे, सौं मंगला अजयकुमार गायकवाड, चैतन्य सुधाकर गवई हे उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार संचालिका सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *