नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे शुद्धीत करा : गणेश वानखेडे
बुलढाणा
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभाग बुलढाणा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय संस्था सुंदरखेड,बुलढाणा अंतर्गत संकल्प व्सयनमुक्ती केंद्र सावळा यांच्यावतीने “नवीन वर्षाचे स्वागत, धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा” हा संदेश देण्यासाठी दि.30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता गांधी भवन, बुलढाणा येथे चित्रप्रदर्शनी व रॅलीचे आयोजन करण्यात आले व व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. मंचावर मा.मनोज मेरत समाज कल्याण अधिकारी बुलढाणा, डॉ.लताताई भोसले-बाहेकर मनोविकार तज्ञ, प्रल्हाद गायकवाड, प्राचार्य भारत विद्यालय बुलढाणा, मनोज दांडगे, अध्यक्ष विदर्भ तलाठी संघटना, ॲड.जयसिंगराजे देशमुख, बी.के.उर्मिला दिदी, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय बुलढाणा, जनार्धनजी काळे, प्रा.रमेश वानखेडे उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी फित कापुन व्यसनमुक्ती चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन केले. त्यानंतर राष्ट्रसंताच्या प्रतिमेला हार अर्पण करुन दिप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रा.रमेश वानखेडे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रभाकर गवळी यांनी केले.
नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने साजरे करणे ही प्रथा कुजत चालली आहे. आजच्या पिढीचा कल व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व्यसनाच्या आहारी आजची पिढी मोठ्या प्रमाणात जात आहे. व्यसनामुळे तरुण आपले आयुष्य बरबाद करीत आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तरुण हा देशाचा कणा असू त्याने देशाचे नांव उज्वल करायला हवे, युवा पिढीने अंमली पदार्थांच्या व्यसनाकडे न वळता पुस्तक वाचन,वृक्षलागवड सारखे व्यसन करुन आयुष्य सुखी व समाधानी बनविण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे, असे प्रतिपादन सर्व मान्यवरांनी केले.
याप्रसंगी व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव कार्य करणारे गणेश भोसले,हरिदासजी खांडेभराड,प्रमोद दांडगे,अनिता डुकरे यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये प्रबोधन विद्यालय बुलढाणा, भारत विद्यालय, आय.टी.आय. बुलढाणा येथील एन.एस.एस.चे पथक, दीपक महाराज सावळे गुरुदेव सेवा मंडळ, गायकवाड सर, अरविंद पवार सर, चाकुरकर सर, डोगरदिवे सर, बेदरकर सर इत्यादी सहभागी होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी रमाकांत माकोने,प्रभाकर गवळी, महेंद्र सोभागे,अभिषेक जाधव, योगेश भुसारी, रघुनाथ राठोड, सौ.रजनी शेळके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमाकांत माकोने यांनी केले.