सार्वजनिक शिवजयंती उत्सव बुलडाणा 2024 बैठक * शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव बुलडाणा 2024 बैठक

* शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा 
       शिवछत्रपतींनी जे स्वप्न उराशी बाळगले त्याला अभिप्रेत अशी शिवजयंती बुलढाणा नगरीत पार पडत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात नवीन समिती यासाठी गठित करण्यात येते. यंदा देखील नवीन समिती गठन करण्यासाठी साठी शनिवार 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता विश्रामभवन येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
       बुलडाण्यातील शिवजयंती उत्सव सोहळ्याने राज्याचे लक्ष वेधले आहे. अठरापगड लोकांना सोबत घेत शिवरायांचा मेळा शिव विचारांचा जागर घालत आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. 19 फेब्रुवारी पूर्वी दरवर्षी नवीन समिती गठीत केली जाते. यासाठी स्थानिक विश्रामभवन येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी होणाऱ्या बैठकीस शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ यांनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *