01 जानेवारी, 2024 पासून होणाऱ्या “रेशन बंद” आंदोलन…
*या आंदोलनाचे घोषवाक्य* “पचास हजार से कम नही। कमिशन मे कुछ दम नही। ”
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे कडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येत की, आपण सर्वांनी “ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली,” या देशपातळीवरील संघटनेने सोमवार, दिनांक 01 जानेवारी, 2024 पासून अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या “रेशन बंद” आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली रेशन दुकाने बंद ठेवावीत, या काळात आपण सर्वांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण देखील करू नये असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीची सर्वात शेवटची कडी असणाऱ्या राज्यातील सर्व 53,000 रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य शासन पूर्णपणे उदासीन आहे. आपण वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची व मोर्चाची शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, महासंघाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन शासनामार्फत दिनांक 12 डिसेंबर, 2023 रोजी मा. सचिव, यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूर, येथे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असली, तरीही त्यामध्ये फक्त आश्वासन देण्यापलीकडे कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
त्यामुळे महासंघाच्या वतीने नाईलाजास्तव “ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली” या देशपातळीवरील संघटनेने दिनांक 01 जानेवारी, 2024 पासून अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या “रेशन बंद”आंदोलन पुकारण्यात आले आहे
या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.
*या आंदोलनाचे घोषवाक्य* “पचास हजार से कम नही। कमिशन मे कुछ दम नही। ”
महासंघाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना कळविण्यात येते की, सोमवार, दिनांक 01 जानेवारी, 2024 पासून आपल्या “रेशन बंद” आंदोलनाची सुरुवात आपापल्या तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर 01 जानेवारी, रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी एकत्र येऊन करावी. या आंदोलनामध्ये प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा यासाठी सर्वांनी मिळून 01 जानेवारी, रोजी तहसील कार्यालयासमोर संविधानिक मार्गाचा अवलंब करून निदर्शने, धरणे, घंटा नाद, थाळी नाद या प्रकारातील आंदोलन करण्यात येणार, यासह राज्यभरातील सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना देखील आपल्या आंदोलनाची कल्पना येऊन या आंदोलनात सहभागी करून घेणे आवश्यक आहे