मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला 20 वर्षे करावास….

मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला 20 वर्षे करावास….

  • नातेवाईकही झाले होते फितूर

बुलढाणा (आदर्श नेतृत्व)
स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला 20 वर्षाची श्रम करावाशाची शिक्षा बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणातील सहा साक्षीदार फितूर झाल्यानंतरही जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांचा प्रभावी युक्तिवाद वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस ही शिक्षा सुनावली आहे.


बुलढाणा तालुक्यातील एका गावामध्ये हे सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती या प्रकरणात पीडित मुलीच्या आईनेच नंतर पोलिसात तक्रार दिली. पीडित मुलगी ही घरी असताना पाय दाबून जबरी संभोग केला होता याप्रकरणी कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही तिला दिली होती याप्रकरणी पिढीतेच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा व विविध जप्ती पंचनामे केली तपासात पीडितेची व आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यांनी घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडेही जप्त केले याप्रकरणी गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास पी एस आय गजानन बाष्ठेवाड यांच्याकडे देण्यात आला त्यांनी तपासचक्र फिरवत फरार आरोपी याचा शोधण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. तब्बल 15 दिवसानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी येणार असल्याची गोपनीय माहिती पीएसआय बास्टेवाड यांना मिळताच त्यांनी सदर आरोपीच्या रात्री 4 वाजता मुस्क्या आवळ्या त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करत कोर्टात दोषारोपण पत्र दाखल केली.


प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एकूण 15 जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या यामध्ये जप्ती पंच वैद्यकीय अधिकारी तपास अधिकारी व घटनास्थळावरील परिस्थिती जन्यपुरावे ग्रामविकास अधिकाऱ्यांची साक्ष या संदर्भाने जिल्हा सरकारी वकील एडवोकेट वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद करत आरोपीस अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली या प्रकरणात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यासह अन्य कलमान्वये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात वादी प्रतिवादी पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायाधीश आर एन मेहरे यांनी आरोपीस पोस्को कायद्याअंतर्गत वीस वर्षे सश्रम कारावास व 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अधिकची शिक्षा यासह अन्य कलमान्वये शिक्षा सुनावले आहे

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *