व्हॉईस ऑफ मीडियाच्या आरोग्य शिबिराला पत्रकारांचा उदंड प्रतिसाद * सेवा कार्याचा यज्ञ तेवत ठेवणार : अनिल म्हस्के

समाजाच्या आरोग्याची काळजी करणारे पत्रकार स्वत:कडे कायम दुर्लक्ष करत असतात. वाढलेली स्पर्धा असो किंवा धावपळीचे आयुष्य, यात आरोग्यविषयक समस्या वाढतात. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सेवा कार्याचा हा यज्ञ कायम तेवत ठेवणार, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी गुरुवारी येथे केले. बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारदिनाचे औचित्य साधून ४ जानेवारी २०२४ रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराला पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी ९ वाजता आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. रक्त तपासणी, शुगर, बीपी, हृदयविकारासंदर्भातील तपासण्या यावेळी करण्यात आल्या. तब्बल ८० पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार सुचविले.

यानंतरही तीन दिवस नेत्ररोगतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पुढील उपचार केले जाणार आहेत. त्याची तारीख देखील लवकरच घोषित होईल. आज पार पडलेल्या शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या चमूसह खासगी वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील सेवा दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉ. आशिष लोखंडे, डॉ. वसीम चौधरी, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. वीरेंद्र काटकर, डॉ. अनुप इंगळे, नितीन श्रीवास्तव, ज्ञानेश्वर मुळे, लखन सरकटे, सिद्धार्थ जाधव, अभिजीत राजपूत, जयदीप दुपटे, हरिदास अंभोरे, रवींद्र गवई, ए. चव्हाण, कविता किरोचे, शेख अखिल, जितू यमले व मंगेश दलाल यांच्यासह सहकाऱ्यांनी शिबिरात आपली सेवा दिली. यावेळी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. राहुल बाहेकर, कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितीन सोनुने यांनीदेखील भेट दिली.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *