धर्मवीर आखाड्याच्या वतीने राज्यस्तरीय भव्य क्रीडा महोत्सव
बुलढाणा, 7 जानेवारी
धर्मवीर आखाडा व आ. संजय गायकवाड यांच्या वतीने दि. 7 जानेवारी रोजी राज्यस्तरीय कॉ्रस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांमधून अमरावतीच्या सलोनी लव्हाळे तर पुरुषांमध्ये वाशिमच्या सचिन खोरणे प्रौढांमध्ये विकास तिडके यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षिसे पटकाविली. धर्मवीर आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व सन्माचिन्ह बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
जिजामाता क्रीडा व व्यापारी संकूलाच्या मैदानावरून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेला शिवसेना युवा कार्यकर्ते कुणाल गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. पुरुषांच्या 5 किलोमीटर कॉ्रस कंट्री स्पर्धेत वाशिमच्या सचिन खोरने यांने 19 मिनिटांत हे अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांकाच्या बक्षिसावर मोहर लावली.
तसेच जळगाव खान्देशचा जयेश पाटील याला द्वितीय क्रमांक ाचे 5 हजार रूपये प्राप्त झाले. तृतीय क्रमांक मोहित शर्मा (नागपूर) 3 हजार रूपये, चतुर्थ क्रमांक विशाल सोनुने (बुलढाणा) 2 हजार रूपये, पाचवा क्रमांक महेश ढोले (शेगांव) 1 हजार रूपये.
महिलांच्या 5 किमी. स्पर्धेत अमरावतीच्या सलोनी लव्हाळे हिने हे अंतर 23 मिनीट 12 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक संपादित करीत 10 हजार रूपयाचे बक्षिस पटकाविले द्वितीय क्रमांक वैष्णवी आयेवार (वाशिम) 5 हजार रूपये, तृतीय क्रमांक अस्मिता सोनुने (बुलढाणा) 3 हजार रूपये, चतुर्थ क्रमांक पलक मुद्रके (अमरावती) 2 हजार रूपये, तर पाचवा क्रमांक आदिती मेटकर (अकोला) 1 हजार रूपये बक्षिस प्राप्त केले.
प्रौढांच्या 2 किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक विकास तिडके 10 हजार रूपये, द्वितीय क्रमांक साहेबराव बोरकर 5 हजार रूपये, तृतीय क्रमांक मोहनसिंह तोमर 3 हजार रूपये, चतुर्थ क्रमांक वासुदेव जाधव 2 हजार रूपये, अजय चाफेकर 1 हजार रूपये बक्षिसे प्राप्त केली. यासर्व विजयी स्पर्धकांना शिवसेना कार्यकर्ते कुणाल गायकवाड, धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, जिवन उबरहंडे, मैदानी स्पर्धेचे प्रशिक्षक विजय वानखेडे, अॅथलेटिक्स असोचे. प्रदेश सचिव गोपालसिंग राजपूत यांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेला पंच म्हणून गणेश जाधव, प्रमोद राजपूत, रवि भगत, समाधान टेकाळे, हर्षल काळवाघे यांनी काम पाहिले.