आज एआरडी सिनेमॉलमध्ये बुलढाणेकरांशी साधणार संवाद
बुलढाणा : क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माता सुनिल शेळके ७ जानेवारी रोजी बुलढाण्यातील प्रेक्षकांच्या भेटीला भेट आहेत. सकाळी साडेअकरा वाजता एआरडी सिनेमॉल येथे भेट देऊन ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
सत्यशोधक चित्रपट ५ जानेवारी रोजी राज्यभर प्रदर्शित झाला. सर्वत्र या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केल्याचे बघायला मिळाले. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. काळजाला भिडणारे संगीत आणि दर्जेदार अभिनयामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
बुलढाणा येथे पहिल्याच दिवशी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचा पहिला शो वसुंधरा पतसंस्थेच्या अध्यक्ष स्वातीताई कन्हेर यांनी महिलांसाठी आयोजित केलेला होता. अनेक महिलांनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा करुन चित्रपट बघितला. अतिशय भावस्पर्शी असा हा चित्रपट पाहताना अनेक वेळा डोळे भरून आल्याचा अनुभव प्रेक्षकांनी सांगितला.