महादेव कोळी समाजाला जातीचे सर्टिफिकेट मिळावे याकरिता दोन जणांचे टॉवरवर चढून आंदोलन सुरू

महादेव कोळी समाजाला जातीचे सर्टिफिकेट मिळावे याकरिता दोन जणांचे टॉवरवर चढून आंदोलन सुरू

 

बीएसएनएल टॉवर हे आंदोलन करण्याचे ठिकाण बनले असल्याची चर्चा शहरात होत आहे.

बुलढाणा शहरातील कोर्ट समोरील बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरातिल टॉवरवर चढलेल्या आंदोलनकर्त्यांनी कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता दोन जणांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
कोळी महादेव हे एस टी मध्ये मोडतात परंतु सर्टिफिकेट मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज महादेव कोळी समाजाचे निलेश गवळी राहणार बोथा गंगाधर तायडे राहणार पलढग यांनी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता बुलढाणा येथील बीएसएनएल टावर वर चढवून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस व संबंधित कर्मचारी यांनी बीएसएनएल टॉवर जवळ धाव घेतली आंदोलन कर्त्यांना आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विनवणी केली परंतु आंदोलन करते मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नसल्याचे सांगत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
या अगोदरही याच बीएसएनएल टॉवर वर चढवून अनेक आंदोलने झाली आहे. म्हणून बीएसएनएल टॉवर हे आंदोलन करण्याचे ठिकाण बनले असल्याची चर्चा शहरात होत आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *