राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता राज्यस्तरीय कृषिप्रदर्शनाचे उद्धाटन होणार आहे. यावेळी पाच राज्यांतील प्रगतीशील शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचे भव्य कृषी प्रदर्शन होत असून शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरणार आहे.
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके राहणार आहेत. यावेळी बियाणे उत्पादक सुखजितसिंग भंगू (पंजाब), बियाणे उत्पादक प्रीतम सिंग (हरियाणा), प्रसिद्ध केळी उत्पादक धीरेंद्रकुमार देसाई (गुजरात), गोसंवर्धन आणि वृक्षारोपणात उल्लेखनीय कार्य असलेले सुरेंद्र अवाना ( राजस्थान), नारळ व सुपारी व्यावसायिक पांडुरंग पाटील (गोवा), मृद व जलसंधारण अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार मिश्रा(नवी दिल्ली), पोल्ट्री फार्म व्यावसायिक रवींद्र मेटकर(अमरावती), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीने अभिता ऍग्रो एक्स्पो हे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. येथील मातोश्री लॉन्सच्या बाजूला १२ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार आहे. शेतकरी, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे