मनोज भाऊ दांडगे यांच्या संकल्पनेतून जयंती निमित्त नवोपक्रम
जयंती निम्मित विविध क्षेत्रात नावलौकीक व्यक्ती सत्कार,व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यशाळा चे आयोजन
जामठी:-(प्रतिनिधी)मनोज भाऊ दांडगे यांच्या संकल्पनेतून जामठी ग्रामपंचायत,जन्मभूमी विकास फाउंडेशन व वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था जामठी तालुका जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव निमित्त ग्राम स्वच्छता पुरस्कार मिळाल्याने जामठी ग्रामपंचायत चा सत्कार,व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा सत्कार,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आध्यात्मिक,कृषी व सोशल मीडिया क्षेत्रात यशस्वी लोकांचा सत्कार व व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण करून व दांडगे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी जिजाऊ वंदनेने करण्यात केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री तुकाराम अंभोरे पाटील साहेब तर उद्घाटक म्हणून राजेंद्रजी जाधव उपविभागीय अधिकारी बुलढाणा तर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती बुलढाणा मनोज भाऊ दांडगे साहेब यांची उपस्थिति होती.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाण्याचे तहसीलदार रुपेश खंडारे साहेब,तालुका कृषी अधिकारी सुरडकर साहेब,धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष गावंडे साहेब, मोताळा केंद्रप्रमुख शिंदे मॅडम,विस्तार अधिकारी गवते साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नसीम सेठ,निलेश भाऊ देठे,निर्मलाताई तायडे,गणेश नरवाडे पाटील,हरिभाऊ सिनकर,राजूभाऊ नरोटे,विजय धंदर,पाटील राजू नागवे पाटील,व्यसनमुक्ती संकल्प नागपूरचे संचालक प्रवीण टीपरामवर सर,गणेश राव वानखेडे,रमाकांत माकोणे, जामठी ग्रामपंचायत सरपंच बिलाल भाऊ गायकवाड,उपसरपंच नंदाबाई कौतिकराव नरोटे,ग्रामसेवक अक्षय साळवे साहेब,तलाठी शेवाळे मॅडम,कृषी सहाय्यक भागवत मॅडम,वनरक्षक एस शिंदे साहेब,जामठी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक मोहिते सर,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील तायडे,पंचायत समितीचे सुरळकर साहेब,माजी सैनिक उत्तमराव तायडे,प्रभू भाऊ जयस्वाल, ग्रामसेवक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विलास संतोषराव तायडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश भाऊ तायडे,तंटामुक्ती अध्यक्ष जाकिर शेठ,तंटामुक्ती अध्यक्ष मनोहरराव तायडे,माजी सरपंच मंगेश पाटील तायडे,माजी सरपंच डॉक्टर अरुणराव तायडे,जेष्ठ नागरिक सिताराम पाटील तायडे,पंच कमिटी तर्फे बबन अर्जुनराव तायडे,जन्मभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश प्रल्हादराव तायडे आदींची उपस्थिती होती.
जामठी येथील राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती अनेक कार्यक्रमांमुळे आकर्षणीय ठरली. त्यामध्ये निश्चितच मनोज भाऊ दांडगे यांची संकल्पना महत्त्वाची ठरली.त्यामध्ये सुरुवातीला सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामठी व ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालय धाड दोन्ही शाळेच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.त्या प्रभात फेरीमध्ये मुलांच्या हाती व्यसनमुक्तीचे,राष्ट्रमाता मा जिजाऊ चे,स्वामी विवेकानंदांचे,बेटी पढाओ बेटी बचाव अशा विविध घोषणांचे फलक मुलांच्या हाती होते व मुलांनी सुद्धा समाज जागृतीच्या विविध घोषणा या प्रभात फेरी मध्ये दिल्या.प्रभात फेरी संपूर्ण गावांमध्ये काढून झाल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामठी व ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीपर नाटिका सादर केली.दोन्ही नाटीकेने संपूर्ण कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेतले.त्यामध्ये दांडगे विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा कैलास धंदर हिच्या भाषणाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले व सर्व त्या ठिकाणी भावनिक झाले.त्याचप्रमाणे कार्यक्रमादरम्यान नागपूर येथून आलेले प्रवीण टिपरामवर सर यांनी व्यसनमुक्ती वर चांगल्या पद्धतीचे प्रबोधन करून व्यसनमुक्तीचे तोटे सांगितले,व्यसन कसे सोडावे यावर उपचार सांगितले आणि व्यसनामुळे परिवार कसे उध्वस्त होत आहे यावर उपस्थित सर्व नागरिक महिला विद्यार्थी आणि मंचावर असलेल्या मान्यवरांना प्रबोधन केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत ग्राम स्वच्छता पुरस्कार जामठी ग्रामपंचायत ला मिळाल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते जामठी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य सर्व पदाधिकारी यांना प्रशस्तीपत्र व मोमेंटो शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले,जामठी गावातील जे लोक आतापर्यंत व्यसनमुक्त झाले अशा लोकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र मोमेंट देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे जामठी गावातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आध्यात्मिक,कृषी,सोशल मीडियामध्ये ज्या लोकांनी सबंध महाराष्ट्रामध्ये नावलौकिक प्राप्त केला अशा व्यक्तींचा सत्कार देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.अशा पद्धतीने हा कार्यक्रम गावामध्ये एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून नवो उपक्रमाची परंपरा सुरू करून गेला म्हणून राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंदांची जयंती ही एक वेगळ्या प्रकारे आकर्षणीय ठरली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माननीय श्री मनोज भाऊ दांडगे यांनी जामठी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये गावांमध्ये विविध प्रकारची विकासात्मक कामे केली त्याचा लेखाजोखा जनतेसमोर या माध्यमातून मांडला.त्याच पद्धतीने येणाऱ्या अडीच वर्षात निश्चितच जामठी ग्रामपंचायत सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये विकासात्मक कामाच्या बाबतीत अव्वल राहील असे सुद्धा मत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी,तहसीलदार साहेब तसेच इतर क्षेत्रातील पदाधिकारी यांनी जामठी गावासंबंधी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून जे प्रस्ताव पाठवले गेले ते सर्व प्रस्ताव त्यांनी स्वीकारून मार्गी लावले व भविष्यात सुद्धा जामठी गावासंबंधी शासकीय योजना संदर्भात जे प्रस्ताव बाकी असतील ते सुद्धा मार्गी लावावे अशा प्रकारचे विनवणी देखील या माध्यमातून केली. तसेच मनोज भाऊ दांडगे यांनी आपल्या प्रास्ताविकातून राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व खऱ्या अर्थाने जामठी गावामध्ये दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारचा नवोपक्रम गावांमध्ये राबवण्यामागचा हेतू एक चांगल्या पद्धतीचा सामाजिक संदेश हा गावामध्ये व जिल्ह्यांमध्ये जावा या हेतूने आयोजन केले गेले होते.यासाठी जामठी ग्रामपंचायत जन्मभूमी विकास फाउंडेशन व वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था यांनी उत्तम प्रकारे आयोजन करून या निमित्ताने सत्कार समारंभ तसेच दांडगे विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळेने उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स त्या ठिकाणी सादर केले व सर्वांची मने जिंकली त्यांचे सुद्धा अभिनंदन प्रास्ताविकातून त्यांनी केली त्याच पद्धतीने जयंतीनिमित्त महत्त्वाचं व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यशाळा या जयंतीच्या माध्यमातून संपन्न झाली व लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रवीण टीपरामवर सर यांनी चांगल्या पद्धतीने उद्बोधन केले. कार्यक्रमाचे उद्घाटकीय भाषण राजेंद्र जाधव साहेब उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात मनोज भाऊ दांडगे यांच्या संकल्पनेचे अभिनंदन करून जामठी ग्रामपंचायत जन्मभूमी विकास फाउंडेशन वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्थेने राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जामठी ग्रामपंचायत चा सत्कार,व्यसन सोडलेला लोकांचा सत्कार,यशस्वी लोकांचा सत्कार व व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यशाळा या कार्यक्रमाचे स्तुत्य आयोजन या ठिकाणी केले.व सर्वांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण माननीय तुकाराम अंभोरे पाटील साहेब यांनी केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत या कार्यक्रमाचे आयोजन भविष्यामध्ये मनोज भाऊ दांडगे यांनी प्रत्येक गावामध्ये करून व्यसनमुक्तीची जनजागृती करावी असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक गोसावी सर व दांडगे विद्यालयाचे उपप्राचार्य जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन खर्चे सर यांनी केले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जामठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी जामठीचे सर्व नागरिक जन्मभूमी विकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.