जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आपला 50% चा हिस्सा उचलणार….मुख्य मंत्री एकनाथ शिंदे

जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आपला 50% चा हिस्सा उचलणार….मुख्य मंत्री एकनाथ शिंदे

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जालना खामगाव रेल्वे मार्ग साठी राज्यराज्य सरकार आपला 50% हिस्सा उचलणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी चिखली येथील जाहीर सभेत दिली

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मिशन 48 शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन 13 जानेवारीला करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती व संवाद समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर आमदार संजय गायकवाड यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल या शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यातून फुंकलं त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यापुढे समोरील उमेदवाराचे डिपॉझिट सुद्धा राहणार नाहीअसं सांगून निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव राहतील यावर शिक्कामोर्तब केलाय …. उध्वस्त झालेले माजी मुख्यमंत्री सध्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहे जो राम का नाही वो किसी काम नही अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अयोध्येत राम मंदिर आणि जम्मू मधील 370 कलम रद्द करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केलाय असे ते म्हणाले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हे घरगडी समजत होते नोकर समजत होते शूद्र समजत होते त्यामुळेच त्यांना सर्व सोडून गेले यांची परिस्थिती सध्या घर का ना घाट का झाली आहे याला जबाबदार उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे ही ते म्हणाले… बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव पेनटाकळी, वैनगंगा पैनगंगा यासारख्या जलस्त्रोत वाढवणाऱ्या प्रकल्पांनाही राज्य सरकार सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यावेळी सांगितलं सरोवराच्या विकासासाठी 370 कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं सोबतच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री यांचे जन्मस्थळ असलेल्या सिदखेडराजाच्या विकासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं…महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत प्रामाणिकपणे काम करत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वेळी दिली

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *