पशुपक्षी प्रदर्शनात युवराजची क्रेज !* मुर्रा जातीचा रेडा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

पशुपक्षी प्रदर्शनात डोणगावच्या युवराज नामक रेड्याने सर्वांचे लक्ष वेधले. अनेकांना त्याच्यासोबत सेल्फीचा मोह आवरला नाही. तब्बल ९०० किलो वजन अन पाच फूट उंचीच्या युवराजची कृषी प्रदर्शनात क्रेज बघायला मिळाली.  
 
     अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज आणि शासनाचा कृषी विभाग यांच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १४ जानेवारी रोजी पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी डोणगाव येथील युवराज रेड्याची सर्वांनी स्तुती केली. ९०० किलो वजनी मुर्रा जातीच्या युवराजने डोणगावचे नाव गाजवले.
 
     डोणगाव येथील प्रायोगिक शेती करणारे राजेंद्र धोगडे यांचा पुत्र कृष्णा व आशिष धोगडे यांना शेतीसोबतच अश्व पालन, श्वान पालन, दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस पालन करण्याचा छंद आहे. त्यांनी घरच्या जातिवंत मुर्रा म्हशीचा एक रेडा पाळला आहे. त्याचे नाव युवराज आहे. दोन वर्षीय युवराजचे वजन ९०० किलोपेक्षा जास्त आहे. उंची ५ फूट लांबी ६ फुटापेक्षा जास्त आहे. भविष्यात युवराजचे वजन दोन हजार किलो, उंची सहा फूटपेक्षा जास्त, लांबी साडेसात फुटापर्यंत जाऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
 
* युवराजवर दिवसाला हजाराचा खर्च 
 
      युवराज हा ऐटबाज रेडा पाहताक्षणी नजरेत भरतो. मालकाने त्याला जीवापाड जपले आहे. त्याच्या सेवेत सदैव एक माणूस असतो. दिवसाला १० लिटर दूध,१० किलो ढेप,१ किलो सफरचंद, २ किलो आटा सोबतच दादरचा हिरवा चारा, गवत, तुरीचे कुटार असा एक दिवसाचा १ हजार रुपयाचा खर्च असल्याची माहिती पशुपालकाने दिली.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *