पुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात याकरिता विविध पक्ष संघटनांचे निवेदन….
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला निवेदनाद्वारे केली मागणी
देशात काही महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याकरिता विविध पक्ष संघटनांची मोठ बांधणी सुरू आहे.
परंतु नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीन संदर्भात असलेली मतमतांतरे पाहता जसे निवडणुकीचा वेळ कमी होत आहे तशी तशी ईव्हीएम मशीनचा निवडणुकीत होणारा वापर बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे व यापूर्वी सुरू यापूर्वी होत असलेल्या बॅलेट पेपर वरच पुढील निवडणुका घेण्यात यावे अशी मागणी देखील निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे
एकीकडे निवडणूक आयोग जिल्हा प्रशासन मार्फत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत तर बॅनरबाजी करून प्रचार आणि प्रसार वाढवण्याचे काम सुरू आहे.
याउलट विविध पक्ष संघटना यांच्यामध्ये ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेत फेरबदल करता येऊ शकतो अशी शंका निर्माण होत असल्याने या संघटना पक्षांच्या वतीने सदर ईव्हीएम वर होणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
बुलढाणा येथील वकील संघाचे जिल्हाध्यक्ष एड विजय साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव जोगदंड वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे काँग्रेस पक्षाचे एड शरद राखुंडे राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एवढी मोठ्या संख्येने उपस्थित होते