बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित जनता दरबार या कार्यक्रमात आले असता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम असल्याची गंभीर टीका केली आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन काय करतात तर संजय गांधी योजनेचा प्रमाणपत्र देतात हे रुटीन काम आहेत.
सरकार आपल्या दारी येत असताना जे कामे होत नाहीत ते झाले पाहिजे परंतु सध्याच्या घडीला सुरू असलेला हा कार्यक्रम फक्त जाहिरात बाजी व स्वतःचा शो व मीडियाच्या माध्यमातून समोर आनने जनतेच्या पैशाची उधळपट्टी, कित्येक ठिकाणी तर तहसीलदार व्हिडिओंना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितले असल्याचा आरोप देखील यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
त्यामुळे आम्ही जनतेचे प्रश्न समजून हा उपक्रम मुंबई येथील शिवालातून सुरू केला असून आज बुलढाणा येथे हा कार्यक्रम घेत असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितले