एका कंपनीद्वारे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करून साडे सहा लाखांची फसवणूक करून पसार झालेल्या आरोपीला तीन वर्षांनी ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली. शनिवारी आरोपीला न्यायालया समोर हजर केला असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नांदुरा तालुक्यातील काटी येथील निवृत्ती नामदेव रोकडे (वय ४०) यांना ओडिसा राज्यातील कचुरता हिंजली येथील बसंतकुमार राधाकांत साहू (वय ३०) याने जाळ्यात अडकवले. एका खासगी कंपनीद्वारे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली. १ एप्रिल २१ ते ९ ऑक्टोबर २१ दरम्यान बसंतकुमार याने निवृत्ती रोकडे यांना ऑनलाईन व तसेच बँकेद्वारे विविध खात्यांमध्ये ६ लाख ४८ हजार २७४ पैसे पाठविण्यास सांगून फसवणूक केली. त्यानंतर तो पसार झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यात ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप काळे यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली सचिन दासार, गणेशा सूर्यवंशी, संदीप राखोंडे, वृषाली सरोदे आदींचे पथक गठित केलेग्रामीण पोलिसांनी ठाणे जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक गौरव राठोड यांच्या सहकार्याने सलग तीन दिवस आरोपीचा शोध घेतला. शुकवारी या पथकाने आरोपी बसंतकुमार राधाकांत साह याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला त्याचबरोबर आरोपीच्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला..