बुलढाणा- दि. १९ ते २० जानेवारी २०२४ दरम्यान दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन, वसुधैव कुटुंबकम या थीम वर आयोजित करण्यात आली होती. वार्षिक स्नेहसंमेलनाच उद्देश विध्यार्थ्याना शैक्षणिक ज्ञानासोबत विविध कृतियुक्त शिक्षण देणे. वार्षिक स्नेहसंमेलन शालेय जीवनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते. कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणार्थ राहते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या विविध गुणांना पैलू पाडण्याचे काम शाळा करत असते. शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान वर्ग नर्सरी ते १२ च्या एक हजार पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रम प्रसंगी एक हजार पाचशे पेक्षा जास्त पालकांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरूनच उद्याचे कलाकार, वृत्त निवेदक, समाजसेवक, कुशल नेतृत्व, संघटक, कुशल राजकारणी घडत असतात. जे भविष्यामध्ये आपल्या भारत देशाचे नावलौकिक वाढवतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. वसंतराव चिंचोले यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व शिवसाईच्या विद्यार्थ्यांची यशोगाथा वर्तमान पत्र व सोशियल मेडियाच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला माहिती मिळत असते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्थाविक संस्थेचे सचिव तथा शिवसाई परिवाराचे संस्थापक डी. एस. लहाने यांनी केले आपल्या प्रास्थाविकामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या यशस्वी घोडदौड उपस्थितांसमोर मांडली. यामध्ये विविध स्पर्धात्मक यश जसे ३२ विद्यार्थी MBBS, IIT, JEE, MHT-CET मधुन विद्यार्थ्यांची निवड तसेच क्रिडा क्षेत्रामध्ये खो-खो या खेळात राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी केलेले प्रतिनिधित्व धनुर्विद्या साठी खेलो इंडिया मध्ये झालेली निवड अशा विविध उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांना माहिती दिली.
स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावर प्रथम वार्षिक पुस्तक “ स्पर्श” मान्यवरांच्या हस्ते अनावरन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी वर्षभरामध्ये सादर केलेल्या त्यांच्या स्वताच्या कवीता, लेख, कहाण्या, चित्र, आणि बरेच काही स्पर्श या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले.
शिवसाईच्या दोन दिवसीय वसुधैव कुटुंबकम या वार्षिक स्नेहसंमेलनाची मागील आठ दिवसाची विद्यार्थी, शिक्षक व पालकांची मेहनत दोन दिवसीय कार्यक्रमाचे दरम्यान सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिवसाई बँक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले