बैलगाडा शर्यतीतून एकोपा वाढीस लागावा- जयश्रीताई शेळके

बैलगाडा शर्यतीतून एकोपा वाढीस लागावा- जयश्रीताई शेळके

चांगेफळ खुर्द येथील जोड छकडा शर्यतीचा शुभारंभ

संग्रामपूर : बैलगाडा शर्यत ही प्राचीन संस्कृती आणि पारंपरिक प्रथेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखली जाते. ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचे काम यामधून होते. वेगवेगळ्या गावांतील बैलजोडी स्पर्धेत उतरत असल्यामुळे एकोपा वाढीस लागतो, असे प्रतिपादन दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केले.

तालुक्यातील चांगेफळ येथे २४ जानेवारी रोजी जोड छकडा शर्यतीचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला पोलीस पाटील मंगला अवचार, माजी सरपंच विश्वास पाटील, बाजार समिती संचालक भाऊराव पाटील, दत्ता पाटील, राजेश्वर देशमुख, दत्ता इंगळे, नमन इंगळे, आकाश बोरसे, दादाराव धंदर, मनोज वाघ, अशोक सरदार, मधुकर पाटील आदींची उपस्थिती होती. तर निवाना, रुधाना, वकाना, सावळा, मडाखेड, चांगेफळ, चाकोती, भेंडवळ, टूनकी, बावनबीर, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद यासह तेल्हारा, अकोला येथूनही नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यत लोकप्रिय आहेत. उच्चभ्रूंच्या घोड्याच्या शर्यतींचे जितके वेड असते तितकेच वेड बैलगाडा शर्यतींचे आहे. महाराष्ट्रासोबत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार रंगतो.
शेतीची कामे संपली की, मनोरंजनाचे, खेळीमेळी आणि उत्साह कायम ठेवण्याचे साधन म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. धार्मिक यात्रा, जत्रा, मोठे कार्यक्रम किंवा ऊरुस यामध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येते. मध्यंतरी बरीच वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *