गाव चलो अभियानात सक्रीय सहभाग घ्या :  लोकसभा समन्वयक दिनेश सुर्यंवशी * बुलडाणा लोकसभा भाजपला देण्याची मागणी

गाव चलो अभियानात सक्रीय सहभाग घ्या :  लोकसभा समन्वयक दिनेश सुर्यंवशी

  • * बुलडाणा लोकसभा भाजपला देण्याची मागणी
बुलडाणा 
      आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक बुथ व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान राबवून केंद्राच्या योजनाची माहिती नमो अ‍ॅप तसेच नव मतदारांच्या भेटी संवाद कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा बुथवरच्या सामान्य कार्यकर्त्यांला नेतृत्व देणारा भाजपा हा एकमेव पक्ष असून जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग शिवाय उज्वला गॅस योजना शेतकरी पिक विमा योजना अशा सर्व योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत करून द्यावी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून कार्यकर्ते जोडावे अपकी बार चारसो पार चा नारा देऊन निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन पश्चिम विदर्भ लोकसभा समन्वयक दिनेश सुर्यवंशी यांनी केले.
 
       बुलडाणा जिल्हा भाजपची जिल्हा कार्यशाळा व गाव चलो अभियानाची महत्वपूर्ण बैठक स्थानिक राजे गार्डन येथे  29 जानेवारी 2024 रोजी दुपारी पार पडली. बैठकीस मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने भाजपा लोकसभा समन्वयक दिनेश सूर्यवंशी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.चैनसुख संचेती, लोकसभा प्रमुख माजी आ.विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, माजी आ. तोताराम कायंदे, लोकसभा समन्वयक मोहन शर्मा, लोकसभा विस्तारक संतोष देशमुख, नगराध्यक्ष गोकूळ शर्मा, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सिंधूताई खेडेकर, देविदास जाधव, गजानन घुले यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांची उपस्थिती होती.
 
       बैठकीस मार्गदर्शन करतांना प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. चैनसुख संचेती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 400 च्यावर जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज झाली असुन त्यासाठीचा पाया असणारा बूथ मजबूत करण्याच्या तसेच भाजपचे आता गाव चलो अभियाना राबविण्यास सुरवात केली असून प्रत्येक गाव व प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी सर्वच तोल मोलाच्या पदाधिकारी कामाला लागण्याचे निर्देश या प्रसंगी आपल्या भाषणातुन दिले आहे.
 
      लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आ. विजयराज शिंदे यांनी सांगितले पक्षाच्या ध्येय धोरण योजनाच्या कामाला उजळणी देऊन महिला, नवमतदार, दलित, मुस्लीम मतदारांना संपर्क साधून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकर घेणे आवश्यक आहे. बुलडाणा लोकसभा यापूर्वी भाजपाकडे होती. डि.जी. गवई, सुखदेव नंदाजी काळे यांनी निवडणुक जिंकून भाजपचा झेंडा लोकसभेत रोवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2024 लोकसभा निवडणुक भाजपाने लढवावी अशी मागणी त्यांनी रेटून धरली. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी जिल्ह्यात असलेल्या 1322 बुथ प्रमुखांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना घरोघरी पोहचविण्यासाठी गाव चलो अभियान यशस्वी करण्यासोबतच सोयाबीन क्विंटल प्रमाणे एक हजार व कापूस दोन हजार बोनस पिकांना द्यावा अशी मागणी या बैठकीत केली.
 
        यावेळी बुलडाणा शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाजपा पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामध्ये लोक कलावंत प्रमोद दांडगे, लोकशाहीर हरिदास खांडेभराड, कलावंत भारत सोनुने, भजनी कलावंत अशोकभाऊ इंगळे, जेष्ठ कलावंत काशीराम निकम, अरुण गिरी, पुरुषोत्तम दांडगे, समाधान तोटे, सुभाष सोनुने, हर्षल चव्हाण, ह.भ.प.देविदास जाधव व तसेच बुलडाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांच्या मार्गदर्शनात रामेश्वर लवंगे, सुनील शिंदे, शेख अनिस, संजय सुरडकर, संजय शिंदे ,विलास सोनुने, सौ उषाताई इंगळे, पूजा विधाते, शिला भालेराव, सुनीता पंडित ,स्वाती हिवाळे व इतरांनी प्रवेश केला. 
       या बैठकीस यशवंत पाटील सुनील वायाळ, प्रकाश गवई, दिपक वारे, सर्व आघाडी, मोर्चा प्रकोष्ठ जिल्हा पदाधिकारी, तालुका सरचिटणीस यांसह प्रमुख पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *