संदीप शेळके यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 संदीप शेळके यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित कार्यक्रम आयोजनाच्या परवानगीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
     राजर्षी शाहू मल्टीस्टेट व धनिक ॲडव्हायझर्स च्या वतीने २९ जानेवारी रोजी  बुलडाण्यातील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणावर “न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यक्रम सुरू ठेवून ध्वनिक्षेपक सुरू ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला आहे.
 
     संदीप शेळके, कृष्णा सावळे यासह इतर ३ मिळून ५ जणांविरुद्ध कार्यक्रमाच्या परवानगीचे उल्लंघन केल्याच्या आरोपा वरून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान संदीप शेळके यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वन बुलडाणा मिशन आणि आम्ही करत असलेल्या कामांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद ‘कुणाच्या तरी’ डोळ्यात खुपत असल्याची सूचक प्रतिक्रिया त्यांनी नामोल्लेख न करता दिली.
 
    पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हरकत नाही, पण प्रस्थापित राजकीय पुढारी कायदा पायदळी तुडवतात ते पोलिसांना दिसत नाही का? असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र पोलिसांनी कुणाच्या इशाऱ्यावर काम करू नये, अशी टीका त्यांनी केली.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *