आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अभिजीत फाटके पाटील यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा
नुकताच आपण देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना देशाला समर्पित केली. याच घटनेनुसार राज्यकारभार चालविण्याकरिता आम आदमी पार्टीची स्थापना झाली आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील हे 31 जानेवारी 2024 रोजी बुलडाणा जिल्ह्यामध्ये येत असून ही त्यांची नियुक्तीनंतर जिल्ह्याला पहिलीच भेट आहे. तसेच प्रदेश सचिव प्राजक्ता देशमुख मॅडम ह्या ही उपस्थित राहणार आहेत.
मलकापूर येथील महेश भवन या ठिकाणी सकाळी 10 वाजता कार्यकर्ता मेळावा, बैठक आयोजित केली असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आम आदमी पार्टी बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे, असे प्रसाद घेवंदे प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले आहे.
तसेच पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली आहे.