मातृतीर्थावर ऐतिहासिक तिसरी विधवा परिषद..

मातृतीर्थावर ऐतिहासिक तिसरी विधवा परिषद..

महात्मा फुलेंचे वारसदार प्रा.लहाने ठरलेत–डॉ. शिंगणे

महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते प्रा. डी एस लहाने हे करीत आहे. विधवा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी चालविलेले विधवांच्या उद्धाराचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. इतिहास याची नोंद घेईल. असे प्रतिपादन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले.

तिसऱ्या विधवा परिषदेचे उद्घाटन मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आज डॉ. शिंगणे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेंर काझी होते. तर विधवा परिषदेचे संकल्पक प्रा. डी एस लहाने, राष्ट्रवादीचे नेते डॉ. रामप्रसाद शेळके, शिवाजी राजे जाधव, माजी आमदार वसंतराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सभापती गंगाधर जाधव, पुनम राठोड ,सवडे ताई ,कल्याणी शिंगणे ,राजेश चित्ते, राम राठोड , राजू शिरसाठ, प्रा. शाहिनाताई पठाण ,स्वाती सावजी, अश्विनी सोनवणे ,प्रतिभा भुतेकर आदींची उपस्थिती लाभली.
दुपारी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन पार पडले. या विधवा परिषदेसाठी सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यात सह जिल्ह्याच्या विविध भागातून विधवा भगिनी, लग्नाळू मुले, विधुर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

पुढे बोलताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले ,सिंदखेड राजा ही भूमी नवा विचार देणारी भूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवविचारांची पेरणी केली. तद्ववतच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी सुद्धा विधवा प्रथा त्याकाळी नाकारली. शहाजीराजे यांच्या निधनानंतर जिजाऊ सती गेल्या नाही. या प्रथेला नाकारून त्यांनी जगापुढे आदर्श उभा करणारा राजा छत्रपती शिवराय घडविला. हा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपण विधवा आहोत,आपन अबला आहोत असं न समजता आहे त्या परिस्थितीमध्ये संघर्ष करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे असे शिंगणे म्हणाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद शेळके, शिवाजीराजे जाधव, यांनी विचार व्यक्त केले.ठराव वाचन शाहिना पठाण यांनी केले. राम राठोड यांनी नियोजन केले.संचलन प्रा.सतीश धोटे तर आभार प्रा. मधुकर गव्हाड यांनी मांनले.

काळानुरूप बदल स्वीकारा –प्रा. लहाने

काही गोष्टी काळानुरूप स्वीकाराव्या लागतात. जे लोक बदल स्वीकारतात अशा लोकांना परिस्थितीशी जुळवून घेता येते. सध्याचा काळ हा विचित्र आहे. गावागावांमध्ये मुलांची लग्न होत नाही. 35, 40 वर्षे वय झाल्यानंतरही मुलांना मुली मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला कमी वयामध्ये विधवा झालेल्या महिलांची संख्या मोठी आहे. अशा वेळी आपण मानसिक बदल स्वीकारून नव विचारांची पेरणी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन कार्यक्रमाचे संकल्पक प्रा. डी एस लहाने यांनी केले. महिलांना विश्वास दिला, त्यांच्या मुलांना सांभाळण्याची तयारी दाखवली तर अनेक विधवा महिला लग्नासाठी तयार होतील असे ते म्हणाले.

 

परिषद लक्ष्यवेधी ठरली

सिंदखेड राजा येथे झालेली महिला परिषद यशस्वी ठरली. सकाळपासूनच हजारो विधवा महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.आतापर्यंत विधवा परिषदेच्या माध्यमातून 12 विधवांचे विवाह लावण्यात आले आहे. तर तीन विवाह आगामी पंधरवड्यात लावले जात आहे.ही चळवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रव्यापी होत आहे.याची सुरुवात प्रा. डी एस लहाने यांच्या संकल्पनेत बुलढाणा येथे प्रथम घेण्यात आली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतर शंभर वर्षांनी एक ऐतिहासिक पाऊल बुलढाणा नगरीतून प्रा. लहाने यांनी टाकले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *