शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे कु.दीक्षा जाधव यु.जी.सी. NET आणि महेश हजारे SET परीक्षेत उत्तीर्ण .

शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे कु.दीक्षा जाधव यु.जी.सी. NET आणि महेश हजारे SET परीक्षेत उत्तीर्ण .

 

शासकीय अध्यापक महाविद्यालय यांच्या कडून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव..

शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील अंतिम वर्षाच्या बि. एड प्रशिक्षणार्थी दीक्षा रामकृष्ण जाधव ‘मराठी ‘या विषयात NET परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत . आणि महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी महेश चंद्रकांत हजारे SET ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या UGC – NET /SET या महत्वपूर्ण परीक्षेत “मराठी” या विषयात दोन्ही बि.एड प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले असून सदर ही परीक्षा गुणवत्तापूर्ण प्राध्यापक बनण्यासाठी घेतली जाते.
कु. दीक्षा जाधव व महेश हजारे यांनी ‘मराठी’ या विषयात सहाय्यक प्राध्यापक या पदा करिता प्राविण्य संपादन केले असून शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सीमा सुरेश लिंगायत व सर्व प्राध्यापक वृंद यांच्या कडून अभिनंदन केल्या गेले तथा सर्व बि.एड प्रशिक्षणार्थी यांच्या कडून कौतूक केल्या जात आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *