उपशिक्षणाधिकारी देवकर यांची महात्मा फुले शाळेस भेट

उपशिक्षणाधिकारी देवकर यांची महात्मा फुले शाळेस भेट

* मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचा घेतला आढावा
बुलडाणा 
       मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत महात्मा फुले शाळा बुलडाणा येथे उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर आणि प्रोजेक्ट लेट्स चेंज जिल्हा समन्वयक तथा सहायक कार्यक्रम अधिकारी मंगेश भोरसे यांनी आज ३ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली.
        मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत उपशिक्षणाधिकारी यांनी आकस्मिक विद्यालयाला भेट दिली. विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रितसर माहिती घेतली. त्यामध्ये परसबाग, वसुधैव कुटुंबकम विद्यार्थ्यांनी तयार केलेले भित्तीचित्रे, शाळेतील सुविचार, विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प, विद्यार्थ्यांनी राबविलेले वृक्षारोपण, मेरी माटी मेरा देश, विद्यार्थी संसद, स्वच्छता मॉनिटर्स, विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग शाळेतील तुळसबाग, ड्रेनेज सिस्टीम, अशा सर्व प्रकारच्या चालणाऱ्या प्रक्रियांची माहिती देवकर आणि मंगेश भोरसे यांनी घेतली.
      महात्मा फुले विद्यालय बुलढाणा येथे उपशिक्षणाधिकारी यांनी पहिल्यांदा भेट दिली. या निमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक लता मानकर यांनी देवकर आणि मंगेश भोरसे, जिल्हा समन्वयक प्रोजेक्ट लेट्स चेंज यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.या सत्कार सोहळ्याला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *