सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलडाणा व बुलडाणा अर्बन यांच्या संयुक्तपणे ‘३५ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२४ हा कार्यक्रम मलकापूर-बुलडाणा-चिखली रा.मा.१७६ (बी.ओ.टी.) या रस्त्याच्या येळगांव पथकर स्थानकावर आयोजित करण्यांत आला. त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राधेशाम चांडक उपाख्य भाईजी यांनी वरील उद्गार काढले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुभाष राऊत, कार्यकारी अभियंता, बुलडाणा तर अध्यक्ष म्हणून बुलडाणा अर्बनचे राध्येशाम चांडक तसेच मंचावर बी.एन. काबरे, उपविभागिय अभियंता, सा.बा.उपविभाग देऊळगांव राजा, डॉ. सौ. दिपाली वि. पाटील, प्रसिध्द नेत्र तज्ञ व फेको सर्जन बुलडाणा यांची प्रमुख उपस्थितीती होती. यावेळी उद्घाटकीय भाषणात राऊत साहेब यांनी सा. बा. विभाग, बुलडाणा अंतर्गत रस्ते सुरक्षा संदर्भात जिल्हयात १००० पेक्षा जास्त सुचना फलक लावण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधकाचे काम नियमानुसार पूर्ण करण्यांत आले असून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे कामही पूर्ण करण्यात आल्याचे सांगीतले तसेच सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व रस्ते अपघात व ऊपाय योजने बाबत शासनाची भुमिका व सामान्य नागरीकांची कर्तव्ये याबाबत विस्तृत माहीती दिली. तर डॉ. सौ. दिपाली वि.पाटील, यांनी वाहनधारकांनी वर्षातून किमान दोन वेळा तरी डोळयांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगीतले तसेच वाहन धारकांनी डोळयांची काळजी कशी घ्यावी व त्यावरील उपचार बाबत विस्तृत माहीती दिली.
अध्यक्षीय भाषणात राध्येशाम चांडक यांनी केंद्र शासनाच्या अहवालानुसार भारतात अपघाताचे प्रमाण जगाच्या तुलनेत १०% इतके असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यासाठी अभियंत्यांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्याबाबत संबंधित कंत्राटदार यांना प्रोत्साहीत करावे तसेच माहीती फलकांचाही वापर करावा व रस्ते चांगल्या दर्जाचे झाल्यावरही अपघाताचे प्रमाण कमी होणार नाही त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांनी वाहन चालविण्याचा परवाना देण्याची पध्दत अधिक कडक करावी ज्यामुळे भविष्यात अपघातांची संख्या कमी होईल तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना १८ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर व वाहतुकीचे नियम समजून सांगीतल्या नंतरच वाहन चालविण्यास द्यावे. कारण आज मर्यादीत कुटुंब व्यवस्था असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी कार्याक्रमात रस्ते जनजागृती अंतर्गत पथनाट्य सादर करण्यांत आले. पथनाटय अतुल मेहकरकर, लेखक व दिग्दर्शक, पराग काचकुरे यांची निर्मिती तर अतुल मेहकरकर, रोहन झिने, प्रसन्न डांगे, शैलेश बनसोड, शुभम गवई, पवन बाबरेकर या कलाकारांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमात मिनाक्षी भोसले, कनिष्ठ अभियंता, सा.बा. विभाग बुलडाणा यांचा विशेष सत्कार करण्यांत आला.