“व्हॅलेंटाइन डे” विरोधात शिवसेना आक्रमक* छेड काढल्यास चोप देऊ उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांचा इशारा

 

सद्यस्थितीत तरुणाईत “व्हॅलेंटाइन डे” ची तयारी करीत आहे. मात्र, या पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली तरूणी व अल्पवयीन मुलींची छेडखानीचे वाढते प्रकार पाहता शिवसेना पुन्हा एकदा ’व्हॅलेंटाइन डे’ला विरोध करण्यासाठी सज्ज झाली आहे. खबरदार जर कोणी मुलींची छेड काढली व वाईट हेतूने त्रास दिला तर – जागीच चोप देवू, असा सज्जड दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलडाणा उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला.

 

14 फेब्रुवारीला जगभरात ’व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी तर प्रेमी युगुल हा दिवस एकत्र घालवत नातं घट्ट करण्यासाठी एकमेकांना भेटत असतात. मात्र, या पाश्चात्य संस्कृतीमुळे मुली व तरूणींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. शहरात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, कॉफी शॉप, बसस्थानक आदी परिसरात अनेक भामटे मुलींच्या मागावर असतात. टीगळ टवाळी करणे, शेरेबाजी करणे आदी प्रकार वाढीस लागले आहेत. अनेकवेळा टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होते. सोबतच बदनामीच्या भितीने कुठे त्या वाच्यता करत नाही, दरम्यान, शिवसेनेचा पूर्वीपासूनच “व्हॅलेनटाईन डे ” ला विरोध आहे. यापृष्ठभूमीवर उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी जिल्ह्यात व चिखलीत कुठेही जर “व्हॅलेंटाइन डे” च्या दिवशी कोणी एकत्र दिसले, तर त्याने मार खायला तयार राहावे, असा इशारा दिला आहे, व्हॅलेंटाइन डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या संस्कृतीचा अशाप्रकारे नाश होताना पाहू शकत नाही. या दिवशी काहीजण तरुणींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. असे लोक तरूणींना आपल्या जाळ्यात ओढून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दिवशी शहरात ठिकठिकाणी शिवसैनिकांना तैनात करण्यात येणार आहे, तथापि यापुढेही छेडखानी विरोधात शिवसेना भक्कमपणे तरुणी व त्यांच्या पालकांच्या पाठीशी उभे राहणार असून पालकांनी अशा प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी निसंकोचपणे शिवसैनिकांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यासह संबंधीत रोडरोमीयोंचा योग्य बंदोबस्त करण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलडाणा उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी केले आहे. सोबतच जो कोणी व्हॅलेंटाइन डे साजरा करेल, त्याला चोप देण्यात येईल, अशी खुली धमकीच शिवसेनेने दिली आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *