फलोत्पादन विषयक शेतीचा विकास करणे यासाठी अभ्यास दौरा….

फलोत्पादन विषयक शेतीचा विकास करणे यासाठी अभ्यास दौरा….

 

बुलडाणा
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत राज्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये उत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी व शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञान व काढणी पश्चात तंत्रज्ञान बाबत सखोल व शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञान उपलब्ध करून देणे व फलोत्पादन विषयक शेतीचा विकास करणे यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर अभ्यास दौरा हा Indian Institute of Horticultural Research, हिसारगड, बैंगलोर येथे नियोजित आहे. सदर अभ्यास दौऱ्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील 28 शेतकरी व 2 नोडल अधिकारी असे एकूण 30 शेतकरी व अधिकारी सदरील अभ्यास दौऱ्यासाठी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता बेंगलोर कडे रवाना झालेले आहेत. सदरील अभ्यास दौऱ्यात IIHR, बेंगलोर येथील प्रक्षेत्र भेट, फलोत्पादन विषयक विषयांचे व्याख्यान तसेच बेंगलोर येथील प्रगतिशील शेतकरी यांच्या शेतावर भेटी असे सात दिवसांचे नियोजन आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीने झाली असून तालुका बुलढाणा, चिखली, मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आह

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *