ढालसावंगी शिवारात अज्ञाताने हरभऱ्याच्या सुडीला लावली आग

ढालसावंगी शिवारात अज्ञाताने हरभऱ्याच्या सुडी ला लावली आग..

हरभऱ्याची सुडी जाळल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान…

बुलढाणा

मौजे ढलसावंगी येथील निलेश विजय गवळी यांची गट नंबर 283 मधील सव्वातीन एकर शेतात डॉलर हरभरा लावला होता त्या हरभऱ्याची काढणी करून शेतात सुडी मारून ठेवली असता दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने डॉलर हरभऱ्याच्या सुढीला आग लावून शेतकऱ्याचे जवळपास चार लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान केले असल्याची माहिती खुद्द शेतकरी निलेश गवळी यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *