प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध आझाद हिंद आक्रमक.
मुख्य प्रवेशद्वारच बंद झाल्यामुळे प्रशासनात खळबळ.
रोहि रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळेपर्यंत राज्यभर आंदोलन करन्याचा इशारा..
बुलढाणा:
रोही रानडुक्कर पारध करण्याची परवानगी 48 तासात न मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयाला ताला ठोकण्यात येईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदनातून देण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक 20685/ 2016 च्या आदेशाचा विपर्यास करून स्थगितीचे कारण पुढे करत रोहित रानडुक्कर मारण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. वन्य हिस्त्र प्राण्यांकडून शेती पिकाची नुकसान भरपाई मिळावी. हिंस्त्र पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी तथा जखमी शेतकरी शेतमजुरांना मोबदला मिळावा. यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने मागील तीन वर्षापासून पाठपुरावा करीत विविध आंदोलने केली. मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य सचिव, मुख्य वनपाल यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊन कायदेशीर अडचणी दूर केल्या. तर सदर मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधीने सभागृहात केलेली आहे.असे असतांनाही अद्याप रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातील उपवनसंरक्षक कार्यालयाकडून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
रोही रानडुक्कर पारध करण्याच्या अनुषंगाने नियमानुसार मागणी अर्ज, करारनामा व इतर प्रशासकीय कायदेशीर बाबींची पूर्तता करून शेकडो अर्ज उपवनसंरक्षक कार्यालयात नियमानुसार आज सादर केले. परंतु अद्याप वरिष्ठांचे आदेश नसल्याचे कारण पुढे करीत परवाना पास नाकारण्यात आल्या आहेत.
त्यामुळेच आज आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रतिकात्मक तालाठोको आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
तर त्वरित मागन्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व उपवनसंरक्षक कार्यालयांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने तालाठोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अँड.सतीशचंद्र रोठे यांच्या वतीने देण्यात आला.
_________