*जलरथ उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील*
बुलढाणा ता.25, जलरथाद्वारे जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण तसेच जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी होणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पाणी व स्वच्छतेची व्यापक जाणीव जागृती होणार आहे. यामध्ये सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे. या जलरथाचा शुभारंभ सोमवारी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा विशाल नरवाडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
पाणी व स्वच्छतेची व्यापक जाणीव जागृती व्हावी, लोकांना पाण्याचे महत्व कळावे, जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे तसेच अंमलबजावणी टप्प्यात असलेल्या योजना व शुद्ध पाण्याचे महत्व लोकांना कळावे या उद्देशाने तसेच स्वच्छ भारत मिशन आणि जलयुक्त शिवार या अभियानाची व्यापक प्रचार प्रसिद्धी व्हावी. या उद्देशाने भारतीय जैन संघटना आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून जिल्ह्यात जलरथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यामध्ये तेरा तालुक्यासाठी तेरा स्वतंत्र जलरथ आहेत. या जलरथाच्या माध्यमातून गावागावात जाऊन पाणी, स्वच्छता व जलयुक्त शिवार याची प्रचार प्रसिद्धी करण्याचे सूक्ष्म नियोजन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नियंत्रणाखाली आणि भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने जिल्ह्यात करण्यात आले आहे. सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक संबंधिताने सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे. याचे सूक्ष्म नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग राहुल जाधव व त्यांच्या चमुने केले आहे. सदर जलरथाच्या माध्यमातून पाणी, स्वच्छता, जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक प्रचार प्रसिद्धी व्हावी, लोकांना पाणी, स्वच्छता, आरोग्य याचे महत्त्व कळावे यासाठी या जलरथाचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट निहाय नोडल अधिकारी निवडण्याच्या सूचना सर्व गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे.