नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ सर्वे करून मदत उपलब्ध करून द्यावी – आमदार संजय गायकवाड
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेले निवेदन
बुलडाणा
सोमवारी रात्री जिल्हाभरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे बुलढाणा मतदारसंघातील मोताळा व बुलढाणा तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आंब्याचा मोहोर झाडला असून संत्रा पिके उध्वस्त झाली आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा तात्काळ सर्वे करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली यासंदर्भात मंगळवारी निवेदन देण्यात आले
जिल्ह्यातील शेतकरी आधीच मी मेटाकुटीस आलेला आहे शेतकऱ्याच्या उत्पादनास भाव नसल्याने तो डबघााईस आलेला आहे कोरोना काळापासून संकटात अडकलेल्या शेतकरी आता कुठे मोकळा श्वास घेऊ पाहत होता मात्र पर्यावरणाने त्याच्या तोंडी आलेला हा घास सोमवारी रात्री हिरावून घेतला सोमवारी सायंकाळपासूनच आकाशात दाटून आलेल्या ढगाणे सात वाजेपासून अवकाळी पावसाचा सुरुवात केली जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी गारपीट झाली सदर अवकाळी पाऊस हा रात्री उशिरापर्यंत सुरूच होता या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याभरातील गहू हरभरा नुकसान झाले तर दुसरीकडे आंब्याचा मोहोर पपई संत्रा मोसंबी अंगूर या फळबाग उत्पादकास प्रचंड नुकसान सोसावा लागत आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात यावे व शासनाच्या वतीने मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केले