एसटी कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष भिकाजी मेढे, अरूण जगताप एसटी इंटक वर्कर्स मध्ये दाखल

एसटी कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष भिकाजी मेढे, अरूण जगताप एसटी इंटक वर्कर्स मध्ये दाखल

बुलडाणा ,(प्रतिनिधी )- बुलडाणा महाराष्ट्र एसटी इंटक वर्कर्स विभागीय मेळावा बुलडाणा शहर कॅांग्रेस कमेटीच्या कार्यालयात इंटक वर्कर्सचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व इंटकचे राज्य सरचिटनिस मुकेशजी तीगोटे, कार्यध्यक्ष नरेंद्रसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थीतीत २७ फेब्रुवारी २०२४ ला आयोजीत केला होता. या मेळाव्याला आमरावती प्रादेशिक सचिव अविनाश वेंडोले व बुलडाणा विभागीय सचिव विकास तीवारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचलन गजानन निकडे तर प्रस्ताविक कीशोर जाधव यांनी केले. यावेळी कास्ट्राईब राज्यपरिवहन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधियक्ष भिकाजी मेढे, कास्ट्राईब राप चे माजी विभागीय सचिव अरून जगताप व निंबाजी इंगळे यांनी महाराष्ट्र एस टी वर्कर्स कॅांग्रेस इंटक या संघटनेत जाहीर प्रवेश केला त्यांचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, राज्यसरचिटणीस मुकेश तीगोटे, कार्यध्यक्ष नरेंद्रसिंग राजपूत यांनी शाल पुष्प गुच्छ देवून त्यांचा इंटक मध्ये आल्या बद्द्ल जाहीर सत्कार केला व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमरावती प्रादेशिक सचिव अविनाश वेंडोले मार्गदर्श करतांना म्हणाले की, राजकारणी लोकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळ खेळत राजकारण केले व आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. कार्यध्यक्ष नरेंद्रसिंग राजपूत यांनी सांगीतले की, इंटक संघटना पूढील काळात कर्मचारी यांच्या बरोबर उभी राहील तर संघटनेचे सरचिटनिस मुकेश तीघोटे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, संघटनेची पूढील दिशा ही एसटी कर्मचारी यांना ७ व्या आयोगानुसार सेवाजेष्ठता नुसार वेतन हे मिळावेत पाहीजे व त्यासाठी संघटने मार्फत सर्व विद्यमान आमदार व विरोधी पक्षनेते या सर्वांना निवेदनाव्दारे सर्व स्थिती अवगत करून देणे व दुसऱ्या बाजूने कोर्टात पीटीशन दाखल करून कायद्या अंतर्गत न्याय मिळवून देऊ. अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण घुमरे म्हणाले की, कोणतेही कार्य हे संघटनेशिवाय होऊ शकत नाही संघटना हीच सरकार व प्रशासन यामधिल दुवा असते त्यामुळे इंटक संघटनेचे हात बळकट करून इंटक संघटनेस पाठबळ द्यावे, मी तुमच्या सोबत तनमनधनाने आहे जिथे माझे काम पडेल तीथे मी तुमच्या पाठीसी अर्ध्यारात्री उभाराहील असे वचन देतो.
यावेळी २०२४ ची कार्यकारणी घोषीत करण्यात आली विभागीय अध्यक्ष पदी किशोर जाधव, सचिव पदी विकास तीवारी तर कार्यध्यक्षपदी अशिष लकडे यांची निवड करण्यात आली व त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला व पूढील भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *