*राज्यातील कृषि क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस*
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0
*शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल*
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले 9000 मे वॅाट च्या कामाचे ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ (देकार पत्र)*
स्पर्धात्मक माध्यमातून निविदा केल्या अंतिम
*9000 मे वॅाट च्या निविदा अंतिम/40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक.*
*25,000 रोजगार निर्मिती होणार*
*2025 मध्ये 40% कृषि फिडर सौर ऊर्जेवर येणार*
18 महिन्यात प्रकल्प पूर्ण करायचा आहे. पण सोबत काम केले तर 15 महिन्यात पूर्ण करू: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना
शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे मिळणार
राज्यभरातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी होते उपस्थित
– आता उद्यापासून उर्वरित कृषि फिडर सौर ऊर्जेवर कसे येतील, याचे नियोजन सुरू करा. थांबू नका. 8 लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
– शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दिवसा वीज ही त्यांची सातत्याने मागणी होती, ती पूर्ण करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.
– 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी साकारली संकल्पना
– पहिला पायलट प्रकल्प अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथे साकारला होता.
– 2000 मे. वॅाट त्या काळात सौर ऊर्जा तयार झाली.
– हुडकोसोबत आजच झाला सामंजस्य करार,
– 5000 कोटी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी देणार.