संदीप शेळकेंना मेहकर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद

* परिवर्तन रथयात्रेचे गावोगावी जंगी स्वागत * लोकप्रतिनिधींनी ३० वर्षांत काय दिवे लावले : संदीप शेळके

तुम्ही त्यांना आमदार केलं नंतर खासदार केलं, त्यांनी सांगितलं त्या माणसालाही आमदार केलं. एवढी सत्तेची पद दिली पण त्यांनी ३० वर्षात काय दिवे लावले? मेहकर विधानसभा मतदारसंघातील समस्या आजही जैसे थे आहेत. पिण्याच्या पाण्यासारखी समस्या अजून सोडवता येत नसेल तर सत्तेत बसून काय फायदा? लोकांसमोर मते मागतांना लाज कशी वाटत नाही, असा घणाघात संदीप शेळकेंनी केला. १० मार्चला वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा मेहकर तालुक्यात दाखल झाली. यावेळी गावोगावच्या सभेत त्यांनी स्थानिक खासदार आणि आमदारांवर टीकेचा आसूड ओढला.

 

आजही बुलढाणा जिल्हा हा मागासलेपणाच्या यादीत गणला जातो. जिल्हावासियांसाठी ही मोठी खेदाची बाब आहे. जगाच्या पातळीवर बुलडाणा जिल्हा हा ऐतिहासिक , सांस्कृतिक, अध्यात्मिक , तसेच पर्यटन बाबत वैभव प्राप्त असलेला एकमेव जिल्हा आहे. तरीसुद्धा या जिल्ह्यात पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी ३० वर्षात काय दिवे लावले? असा प्रश्न उपस्थित होतो आहे, असे संदीप शेळके म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निघालेली वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीची परिवर्तन रथयात्रा आज मेहकर तालुक्यात दाखल झाली. याआधी खामगाव, शेगाव, संग्रामपूर, मोताळा तालुक्यात विकासाचे व्हिजन मांडून शेळकेंनी परिवर्तनाचा एल्गार पुकारला. शेळके यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या विचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीची सुरुवात केली. या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ” ब्ल्यू – प्रिंट ” आम्ही तयार केली आहे. जनतेने खासदारकीची संधी दिली तर त्यावर पुरेपूर अंमलबजावणी आम्ही करणार असल्याचा शब्द संदीप शेळके यांनी दिला. ते म्हणाले जिल्ह्यात परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे. नदीजोड प्रकल्प , प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, उच्च दर्जाचे शिक्षण ,महिला सक्षमीकरण ,सिंचनाची सोय असा विस्तारित विकास अजेंडा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने रथयात्रा मार्गक्रमण करत आहे. जनतेने संधी दिल्यास संधीच सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास नेमका कसा असतो हे आपण दाखवून देणार असल्याचे संदीप शेळके म्हणाले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *