घटना बदलण्यासाठी हव्यात 400 जागा भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधानावर… काँग्रेस व समविचारी पक्ष संघटनेचे निदर्शने…

घटना बदलण्यासाठी हव्यात 400 जागा भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधानावर काँग्रेस व समविचारी पक्ष संघटनेचे निदर्शने…

 

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने.. निवेदन

संविधान विरोधी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही- सुनील सपकाळ

 

अलीकडे संविधान विरोधी वक्तव्य वारंवार केली जात आहे. संविधानामुळे आपला देश अबाधित आहे. सर्व जाती धर्म एका चौकटीत बांधण्याच काम संविधानाने केलआहे. असे असले तरी भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी संविधानात बदल करण्यासाठी भाजपला बहुमत (400 )जागा द्या अशा पद्धतीच वादग्रस्त वक्तव्य केले.संविधान बदल करू म्हणणारे हे वक्तव्य लोकशाही विरोधी असून असे वक्तव्य करणाऱ्यास कठोर शासन करावे,असे वक्तव्य कदापि खपवून घेतले जाणार नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांनी केले.

खासदार आनंत हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विविध सामाजिक संघटनांचे वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्याचे खासदार आनंत हेगडे यांनी संविधान दुरुस्तीसाठी दोन तृतीयांश मतदान आवश्यक आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करा अशा पद्धतीचे वक्तव्य केले. संविधान बदलाची त्यांची भाष्या देशहिता विरोधी आहे.संविधान बदलणे हे काही देश विघातक शक्तींचे प्रयत्न आहेत. अशा पद्धतीचे वक्तव्य काही लोक वारंवार करत आले आहेत, व त्यांना पाठबळ सुद्धा दिल्या जात आहे. अशी वक्तव्य करणाऱ्या खासदारअनंत हेगडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुनील सपकाळ यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील सपकाळ, एडवोकेट विजय सावळे, डॉक्टर पुरुषोत्तम देवकर, एडवोकेट नंदू भाऊ साखरे ,पत्रकार गणेश निकम, अमोल रिंढे, सुजित देशमुख, एडवोकेट राज देवकर, डॉक्टर मनोहर तुपकर, शैलेश खेडकर, एडवोकेट राखुंडे, एडवोकेट दीपक मापारी एडवोकेट वाय वाय जाधव, एडवोकेट चिंचोळकर ,एडवोकेट अरुण इंगळे, रवी पाटील, सुरेश सरकटे ,पृथ्वीराज तायडे, सत्तार कुरेशी,वृषभ साळवे ,एडवोकेट ठेंग,किरण खिल्लारे, एडवोकेट दीपक मापारी आदींची उपस्थिती होती.

 

संविधान देशाचा आत्मा- विजय सावळे

भारताच्या संविधानाचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे. भारतामध्ये लोकशाही संविधानामुळे आहे.एवढा मोठा खंडप्राय देश परंतु संविधानामुळे सर्व जनता सुखी समाधानी जीवन जगत आहे. मात्र या सुखी समाधानी भारतीयांच्या जीवनालाच काही जातीयवादी लोकांची दृष्ट नजर लागली आहे. त्यामुळे असे लोक वारंवार संविधान बदलाची भाषा करतात.तेच लोक संविधानाच्या विरुद्ध जहर पसरवीत आले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *