बुलडाणा जिल्हा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्ष पदी जिवन जाधव,
बुलडाणा,(प्रतिनिधी )-अनुसुचित जाती जमाती आयोग भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त बुलडाणा जिल्हा कास्ट्राईब राज्यपरिवहन कर्मचारी संघटनेची १० मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजता बुलडाणा येथील विसावा सरकारी विश्रांती गृहा मध्ये जिल्हा कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्य एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे माजी राज्यउपाध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या आध्यक्षतेखाली जिल्हा भरातून आलेल्या असंख्य पदाधिकारी सभासदांच्या उपस्थीत संपन्न झाली. या बैठकीत बुलडाणा जिल्हा भरातून राप कास्ट्राईबचे असंख्य पदाधिकारी, सभासद हजर होते. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यावर आज रोजी प्रशासनाकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारा यावर सविस्तर चर्चा झाली त्या अन्याय अत्याचारा विरूध्द कसे लढावयाचे यावर आकृतीबंध नियोजन करून लढावयाचे ते नियोजन ठरविण्यात आले.
या महत्वपूर्ण बैठकीत २०२४ ची जिल्हा कार्यकारणी सर्वांच्या मताने लोकशाही मार्गाने जाहीर करण्यात आली
विभागीय अध्यक्षपदी जिवन जाधव,विभागीय सचिव भारत आराख, जिल्हा कार्यध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव, विभागीय कोषाध्यक्ष जितेंद्र साळवे, विभागीय उपाध्यक्षपदी सेनि वाहतूक निरिक्षक आत्माराम चौतमोल तर विधी सल्लागारपदी सेनि विभागीय वाहतूक अधिकारी (आपराध) दिपक साळवे यांची एकमताने निवड करून त्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी पद्दमाकर डोंगरे, हर्षदिप सोनपसारे, गौतम जाधव, दिपक मिसाळकर, रवि अवसरमोल, भाऊसाहेब देशमुख, विशाल जाधव, राजू गुरचवळे,मीलींद मेढे, संतोष घेवंदे, अतूल सरकटे, प्रितेश तायडे, अशोक गवई, पी.ए.पवार, किर्तीमाला दाभाडे, अनिता वाकोडे, संगीता वानखडे, लक्ष्मी बंड इत्यादी यावेळी जिल्हाभरातून असंख्य पदाधिकारी, सभासद हजर होते. या बैठकीचे प्रस्ताविक जीवन जाधव, सुत्रसंचलन भारत आराख तर आभार प्रदर्शन जितेंद्र साळवे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.