बुलढाणा (प्रतिनिधी)
आज दी 16 रोजी उपवनसंरक्षक माननीय सरोजा गवस यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी तथा साहेब वनसंरक्षक बुलढाणा वनपाल एस.डी वानखेडे पाडळी वर्तुळ , वनपाल ए.एस खान, व सहकारी यांनी. आरोपी अजय वाघा राठोड रा. पळसखेड नाईक वय 50 वर्षे. याने वनपरिक्षेत्र बुलढाणा प्रादेशिक वन विभाग बुलढाणा मध्ये पळसखेड नागो बीट पाडळी वर्तुळ वन खंड क्रमांक 526 मध्ये वनाक्षेत्रात बारूद गोळा टाकून वन्य प्राणी रानडुक्कर (wild pig scrofa)याची शिकार करून व वन्य प्राणी रानडुक्कर याला भाजून ते विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सदर इसमांकडून जागेवर वन्यप्राणी रानडुक्कर याचे मांस 19.500kg जप्त केले तसेच लोखंडी तराजू लोखंडी पारडा लोखंडी टोपले जर्मन गज एक कोयता स्टील टोपले दोन सुरी वन्य प्राण्याचे मास कापण्यासाठी लाकडी ठोकळा इत्यादी साहित्य जप्त केले आले.
सदर इसमावर 1972 चे कलम 2,(16)9,29,39,44,50,51(1)(c ) भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) आय, डी,52 महाराष्ट्र Huwa नियमावली 2014 चे नियम चे कलम 9 (ई) वन गुन्हा जारी करून माननीय विद्यमान न्यायालय प्रथम वर्ग बुलढाणा या ठिकाणी हजर करण्यात आले.सदर कारवाई मध्ये वन कर्मचारी श्री बी.ए घुले वनरक्षक श्री पी.पी मुंढे वनरक्षक कुमारी एम.जी बोरकर वनरक्षक वाहन चालक प्रवीण सोनवणे दीपक गायकवाड यांनी कार्यवाही पार पाडली.