विधवा पूनरविवाह सोहळ्यात एसपी कडासनें सह मान्यवरांची उपस्थिती * सत्यशोधक ची ‘काशीबाई’ साधणार बुलडाणेकरांशी संवाद !

विधवा पूनरविवाह सोहळ्यात एसपी कडासनें सह मान्यवरांची उपस्थिती * सत्यशोधक ची ‘काशीबाई’ साधणार बुलडाणेकरांशी संवाद !

 बुलडाणा : 
 
       मानस फाउंडेशन बुलढाणा यांनी आयोजित केलेल्या एकल महिला, विधवा घटस्फोटीत पुनर्विवाह सोहळा बुलढाणा येथे होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गाजलेला चित्रपट ‘सत्यशोधक’… या चित्रपटात काशीबाई या विधवा महिलेची दर्जेदार भूमिका करून दर्शकाच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री ‘पायल साळुंके बुलढाणा येथे येत आहे. विधवा विवाह सोहळ्यामध्ये ही अभिनेत्री बुलडाणेकरांशी संवाद साधणार आहे.
 
      बुलढाणा येथे मानस फाउंडेशन द्वारा प्राध्यापक डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेतून एकल महिला सामूहिक पुनर्विवाह सोहळा 18 मार्च रोजी भातृ मंडळ मंगल कार्यालय शिवशंकर नगर बुलढाणा या ठिकाणी आयोजित केला आहे. या विधवा विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय जोडप्यांचा सहभाग राहणार आहे. यासाठी  नियोजन आयोजक मानस फाउंडेशनने चालविले आहे. विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे, विधवांच्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी प्रा. लहाने यांनी यापूर्वी विधवा विवाह परिषद आयोजित केली. तर आता 18 मार्च रोजी ऐतिहासिक ठरणारा महाराष्ट्रातील प्रथम विधवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा बुलडाणा नगरीत होत आहे. 
 
विधवा विवाह सोहळ्याचे प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने राहणार आहे.  नगर परिषदचे मुख्याधिकारी  गणेश पांडे , अमोल दिघुळे, डॉक्टर वसंतराव चिंचोले विशेष अतिथी आहेत. प्रा. डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेतील विवाह सोहळ्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदरभाव दाखवीला असून अशा पद्धतीचे काम बुलढाणा शहरात होणे ही समाज परिवर्तनाला चालना देणारी गोष्ट असल्याचे एस.पी. म्हणाले. मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराने आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना विधवा विवाह सोहळ्यासाठी निमंत्रण दिले असता त्यांनी ते नि स्वीकारले व या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
 
* सकारात्मक दृष्टीकोण जोपासूया–शाहिनाताई पठाण
 
      महिलांच्या जीवनामध्ये बदल घडला. तो सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दाम्पत्याच्या प्रयत्नाने मुलींना शिक्षण मिळाले आणि महिलांच्या जीवनामध्ये बदल सुरू झाला. शिक्षणामुळे अज्ञान, जुण्या अनिष्ट रुढी, प्रथा परंपरांची जळमटे दूर होऊ लागली आहे. याच विषयाला समर्पित सत्यशोधक चित्रपट बनविण्यात आला. या चित्रपटांमध्ये काशीबाई हे पात्र दर्शकांच्या पसंतीला उतरले आहे, हा दर्जेदार अभिनय अभिनेत्री पायल हिने करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ही अभिनेत्री विधवा विवाह सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. विधवा विवाह सोहळ्या नंतर अभिनेत्री पायल साळुंके पुणे ह्या बुलडानेकरांशी संवाद साधणार आहे. सकारात्मक दृष्टीने या सोहळ्यात सहभागी व्हावे .
 
* जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी यावे – लहाने
 
     आयोजित विवाह सोहळा आपल्या परिवारातील सोहळा मानून आपल्या भगिनींना आशीर्वाद देऊ या,
विधवांच्या जीवनाला नवीन कलाटणी देणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *