मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेच्या रणांगणात दोन प्रतिस्पर्धी महीला समोरासमोर उभ्या ठाकणार..?

महायुती कडून आ.श्वेता महाले तर महाविकास आघाडीकडून ऍड. जयश्री शेळके उमेदवार असण्याची दाट शक्यता…

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय, त्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलय.. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अजून उमेदवार जाहीर झाले नसल्याने उत्सुकता लागून राहिली आहे..तर सध्याच्या परिस्थितीनुसार मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात महायुतीकडून आमदार श्वेता महाले आणि महाविकास आघाडी कडून जयश्री शेळके अश्या दोन महिला रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे…

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहेत, मात्र यावेळी त्यांच्या विरोधात नाराजीची लाट असल्याच भाजपने केलेल्या सर्वेत समोर आलंय.. त्यामुळे या जागेवर आता भाजप आपला दावा करत आहे.. त्यासाठी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली असून, त्यासाठी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा होत आहे.. परंतु नरेंद्र खेडेकर हे कमकुवत उमेदवार असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे.. त्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड. जयश्री शेळके या प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात असे त्या काळात या दोन्ही महिला लोकसभेच्या रणांगणात एकमेका विरोधात उभ्या ठाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.. उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना जयश्री शेळके यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर मोठ्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली होती, त्यामुळे महाविकास आघाडी कडून जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळणार असल्याच राजकीय वर्तुळात चर्चा आहे

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *