शिवसेना उबाठा बुलढाणा लोकसभेची जागा वंचितला सोडणार..?

उभाठा शिवसेना बुलढाणा लोकसभेची जागा वंचितला सोडणार..?

 

  1. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिता देखील लागली आहे. असे असताना अद्याप पर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी मधले बरेच उमेदवारांची घोषणा अजून झालेली नाही.
    अशातच वंचित बहुजन आघाडी सोबतची बोलणी फीसकटली ..? असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीने 6 जागेचा नवा प्रस्ताव दील्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रस्तावाचा काँग्रेसने स्वीकार केला असून शिवसेना उभाटा गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी सुद्धा या प्रस्तावाला मान्यता द्यावी असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मत व्यक्त केले.
    2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बऱ्याच ठिकाणी वंचित मुळे डायरेक्ट फटका बसला यात संभाजीनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, परभणी, हातकलंगने, लातूर, परभणी, चंद्रपूर गडचिरोली नाशिक या मतदारसंघात एकालाखावून अधिक मतदान घेतल्याने  काँग्रेसचे बरेच उमेदवार पडले होते.यावेळी असे होऊ शकते त्यामुळे काँग्रेस बाळासाहेबांना सोडू शकत नाहीं हे वास्तव आहे.
    याची जाणीव ठेवत वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागा तुम्ही सांगा त्याजागी वंचित काँग्रेसला मदत करेल असे लेखी पत्रच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली.
    परंतु पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वंचितला सोबत घेण्यासंदर्भात चर्चेला उधाण आले आहे. तर काँग्रेस त्यांच्या कोटयातील दोन जागा देण्यास तयार असून शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ह्यानि देखील त्यांच्या वाटेवर आलेल्या दोन- दोन जागा सोडतात का हे पाहावं लागणार आहे.
    अशात जर शिवसेना उभाटा गटांनी दोन जागा सोडायच्या झाल्यास यातील एक जागा बुलढाणा लोकसभेची जागा ही वंचितला सुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
    परंतु महाविकास आघाडीतील बरेच इच्छुक उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी या अगोदरच संपर्क करून आपापली फीडिंग लावली असल्याचे देखील बोलले जातात आहे. अशात वंचित बहुजन आघाडी चा समावेश महाविकास आघाडीत झाल्यास व बुलढाणा लोकसभेची जागा वंचित ला सुटल्यास वंचितच्याच कार्यकर्त्याला ही उमेदवारी मिळेल का..?
    तर बाळासाहेब आंबेडकरांनी एक व्हिडिओ जारी करून आपली भूमिका मांडली आहे.त्यात ते म्हणतात की माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती.
    आणि लाचारी मी पण मान्य करणार नाही
    परंतु चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवल्या जातंय आणि आम्ही हे कदापि मान्य करणार नाही
    आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे.
    परंतु काही गोष्टी सांगू शकत नाही.परंतु काही ठिकाणी आपण जिंकू शकतो अशी परिस्थिती आहे.
    शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या मतदाराने पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर काम करावे असे आवाहन केले आहे.
    आज होणारी पत्रकार परिषद ही उद्या दिनांक 27 मार्च रोजी होणार असून वंचित बहुजन आघाडीची पुढची दिशा काय असणार हे पत्रकार परिषदेतून जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *