मनोज भाऊ दांडगे यांच्या संकल्पनेतून जामठी येथे भास्कर पेरे पाटील यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न

 

डॉक्टर राजेंद्र जी शिंगणे साहेब व सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधक कार्यक्रमाचे आयोजन

गावच्या विकासात लोकांचा सहभाग महत्त्वाचा :- भास्कर पेरे पाटील

गावाच्या विकासासाठी तळमळीने कार्य करण्याची गरज : मनोज दांडगे

जामठी:- (ता.30 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, सदस्य जिल्हा नियोजन समिती बुलढाणा,संस्थापक अध्यक्ष वत्सलाबाई दांडगे बहुउद्देशीय संस्था जामठी,संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेवराव बापू दांडगे शैक्षणिक संकुल धाड व नियोजित संस्थापक अध्यक्ष जन्मभूमी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्यालय चिखली कार्यक्षेत्र जिल्हा बुलढाणा माननीय श्री मनोज भाऊ दांडगे यांच्या वतीने 30 मार्च 2024 वार शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता सिंदखेड राजाचे लोकप्रिय आमदार लोकनेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब व चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता ताई महाले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधन जामठी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या जाहीर सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष श्री.शंतनुभाऊ बोंद्रे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.देविदासजी पाटील जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा तालुका अध्यक्ष श्री.निलेशभाऊ देठे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली विधानसभा उपाध्यक्ष श्री.गणेशदादा नरवाडे,भाजपा नेते श्री सुनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी नेत्या सौ.निर्मलाताई तायडे,
राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा सचिव श्री. विजूभाऊ पाटील धंदर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जिल्हा प्रमुख श्री.जगन कानडजे पाटील,राष्ट्रवादी नेते कबीरभाऊ बर्डे,राष्ट्रवादी जिल्हा सचिव श्री.राजूभाऊ नागवे,राष्ट्रवादी नेते शिवाजी भाऊ पाटील,राष्ट्रवादी युवा नेते श्री.महेश शेवाळे,श्री.जगनभाऊ मिरगे,श्री.पांडुरंगजी गुळवे,श्री.पांडुरंग पवार,श्री.राहुल गुळवे,श्री.शरदभाऊ देशमुख,श्री.सुरेशजी जगताप श्री.राजूभाऊ जगताप, श्री.दिलीपभाऊ माळोदे श्री.कल्याणजी मोरे,श्री.अर्जुनभाऊ सुस्ते,शिवसेना नेते श्री.धनंजय बारोटे,श्री, श्री.हरिदासजी कड श्री.राजेंद्रजी नरोटे,श्री.महेंद्रभाऊ कड
,सरपंच बिलाल गायकवाड,उपसरपंच श्री.कौतिक नरोटे,श्री.संजय जाधव,अक्षय साळवे साहेब,श्री.रामू कचाटे श्री.एकनाथजी पिंपळे दिलीप भाऊ पांडव,श्री.हरिभाऊ सिनकर,समाधान फुसे,श्री. समाधान सरोदे,श्री.किरणभाऊ सरोदे,श्री.प्रदीप पाटील,श्री.संतोष सपकाळ,श्री.नरोटे सर,श्री.नंदू भाऊ हुंडीवाले श्री. प्रमोदजी दांडगे,श्री. सुनील सुरडकर श्री.जगन्नाथ भाऊ वाघ तसेच
बुलडाणा व चिखली तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील जनसमूदाय मोठ्या संख्येने तसेच गावातील नागरिक महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
खरंतर गेल्या सात वर्षापासून मनोज भाऊ दांडगे यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत,यावर्षी तीच परंपरा कायम ठेवून शिंगणे साहेब व महाले ताई यांच्या वाढदिवसानिमित्त भास्कर पेरे पाटील यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधले……….

मनोज भाऊ दांडगे यांनी अतिशय थाटामाटामध्ये डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब व श्वेता ताई महाले पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला.या वाढदिवसानिमित्त मनोज भाऊ दांडगे यांनी फटाक्यांच्या आतशबाजीने पेरे पाटील तसेच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.भव्य दिव्य असा सभामंडप मोठमोठे पथदिवे,भव्य दिव्य असा हार, केक द्वारे,भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा केला.

डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब व आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनोज भाऊ दांडगे यांच्या वतीने पाटोदा गावचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले..यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले की,गावाचा विकास साधायचा असेल तर आपआपसातील मतभेद बाजुला सारा..राजकारणामुळेच कितेक वर्षापासुन गावातील विकास खुंटला आहे.पाडापाडीशिवाय आपन काही करत नाहीत.प्रत्येक आळीतील जातीतील सरपंच,सदस्य निवडुन दिले तरी विकास का झाला नाही.असा सवाल केला. लोकांना योजनाची सवय लागल्यामुळे आळशी प्रवृत्ती वाढली.दुस-यावर अवलंबुन राहायी सवय लागली.त्यमुळेच नागरिकाचे कर्तव्य विसरुन गेली.गावातील नागरिकानी ग्रामपंचातचा कर भरला तर खासदार,आमदाराच्या फंडाची वाट पाहिची गरज भासणार नाही.घरातील सांडपाणी जमीनीत मुरवा,पाणी जपुन वापरा,झाडे लावा,शाळा महत्वाची आहे.जरा लक्ष द्या लाखो रुपये पगार शिक्षक उचलतात.आपली मुलं शिकली तरच समाजाचे कल्याण होणार आहे.शाळेकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.गावातील विकास करायचा असेल तर विरोध करणे सोडा.सरपंच,सदस्य,ग्रामसेवकाकडुन कामे करुन घ्या तरच गावाचा काया पालट होईल..नागरिकांनी घर पट्टी भरलीतरच ग्रामविकास निधी जमेल या रक्कमेतुनच गावातील रस्ते,नाली,लाईट,व्यवस्थीत होतील.म्हणुन नागरिकांनी ग्रामपंचायतला कर भरणा करावा…हे पाहिजे ते पाहिजे ते द्या करत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा द्या…नंतर ग्रामपंचायतला भांडा…शासकीय योजनावर अवलंबुन न राहता गावात उद्योग उभारा..आर्थीक विकास होईल..नुसतं निवडणुका घेऊन राजकारण करत बसल्याने गावाचा विकास होणार नाही..सारे एकत्र या चांगला वेळ देणारा व्यक्ती निवडुण द्या पाच वर्ष तो चांगले काम करेल..पुढील पाच वर्षात तुमच्या गावात विकासाची गंगा पोहचलेली असेल..असा अश्यावाद पेरे पाटील यांनी व्यक्त केला. *पेरे पाटील यांनी आपल्या भाषणातून जामठी गावच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले त्यांनी सांगितले जामठी ग्रामपंचायतचा कार्यकाल जवळपास अडीच वर्षाच्या आसपास झालाय त्यातील एक वर्ष कोरोणा काळात गेले. दीड वर्षांमध्ये कोट्यवधीची कामे जामठी ग्रामपंचायत ने केली आमच्याच ग्रामपंचायतच्या प्रमाणे जामठी ग्रामपंचायत देखील नागरिकांना मोफत दळण देणे,मोफत मसाले दळण देने,तसेच संपूर्ण गावांमध्ये गट्टू बसवणे झालेले आहेत, स्वच्छता आहे,घंटा गाडी सुरू आहे,कचरा व्यवस्थापन आहे,सिमेंटचे रस्ते झालेले आहेत,स्मशानभूमीचे सौंदर्यकरण झालेलं आहे,अनेक दिवसापासून या ठिकाणी पाणीपुरवठ्याची योजना व्यवस्थित नव्हती ती योजना ग्रामपंचायत ने राबवून घराघरापर्यंत पाणी पोहोचण्याचा काम केलं.गावामध्ये हजारोच्या वर झाडांची संख्या आहे.असे विविध अंगी कार्यक्रम योजनांच्या माध्यमातून जामठी ग्रामपंचायतनी मनोज भाऊ दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांनी निश्चित प्रकारे पूर्ण केलेले आहेत व पुढे देखील करतील यात शंका नाही.त्यामुळे निश्चितच जामठी गाव भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव म्हणून नक्कीच होईल, त्याचबरोबर मनोज भाऊ दांडगे यांनी कोरोना काळामध्ये मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये केलेले कार्य,त्यांची आरोग्य सेवा,त्यांची रक्तदान शिबिरे, शेतकरी हिताची कार्य यांचा उल्लेख करत त्यांनी कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना खूप मोठा सामाजिक कार्य या परिसरामध्ये व या जिल्ह्यामध्ये निश्चित प्रकारे केलेला आहे याची आवर्जून नोंद त्यांनी उपस्थितांना करून दिली*

कार्यक्रमाचे आयोजक श्री मनोज भाऊ दांडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर शिंगणे साहेब व श्वेता ताई महाले पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत,जामठी ग्रामपंचायत ने अडीच वर्षांमध्ये केलेला गावचा विकास यासंदर्भात मान्यवर व उपस्थितांसमोर लेखाजोखा मांडला व जामठी ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी आतापर्यंत केलेली कामे उल्लेखनीय असून भविष्यात देखील ते चांगले काम करतील यासाठी शुभेच्छा दिल्या त्याच पद्धतीने मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील आतापर्यंत सामाजिक सेवेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले आणि याही पुढे जामठी गावाबरोबर मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या आधी जसा कटीबद्ध होतो त्याचप्रमाणे भविष्यात सुद्धा कटिबद्ध राहील.असेही ते म्हणाले

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *