जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक श्री. मतीन शेख नजीर श्री. आनंद वाडे, , श्री. दिलीप टेकाडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण असलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रत्येकी टॉप 3 शाळा यांना देखील देखील पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये इयता 5 वी करिता जि.प.प्रा. शाळा सोनाळा, जि.प.प्रा. शाळा कोथळी, जि.प.प्रा. शाळा धोरवी व इयत्ता 8 वी करिता जि.प.ऊ.प्रा. शाळा उकळी, जि.प.ऊ. प्रा. शाळा मांडवा, जि.प.ऊ.प्रा. शाळा खुरामपुर. सदरील पुरस्कार श्री. देवकर साहेब (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या
गुणवत्ता वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे शिक्षकांना आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला श्री. ईश्वर वाघ (विषयसाधनव्यक्ती समग्र शिक्षा), पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक, तथा ओपन लिंक फाउंडेशनचे रघुनाथ वानखडे (कार्यक्रम समन्वयक), विरेंद्र देशमुख (जिल्हा समन्वयक) उपस्थित होते.