मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळने अभीमानास्पद आहे.
पवित्र रमजान महिन्यात अभिवचन देतो…
खासदार नव्हे सालदार म्हणून काम करेल.
असलम शहा.
एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली हेच मुस्लिम समाजासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्याकडे एक रुपया नसतांना खासदारकीची उमेदवारी मिळाली हेच यावर अद्यापही विश्वास बसत नाही.
अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांचा तीस वर्षापासून मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, आणि हेच पद माझ्यासाठी खासदारकी पेक्षा मोठे आहे. पवित्र रमजान महिन्यांमध्ये जिल्हावासीयांना अभिवचन देतो गद्दार होणार नाही. निष्ठावान राहील. प्रामाणिकपणे कार्य करेल. खासदार म्हणून नव्हे तर सालदार म्हणून वागेल.
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच आझाद हिंद च्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना उपरोक्त मत असलम शहा यांनी व्यक्त केले.
तर पुढे बोलताना शहा म्हणाले मी तुकोबांचा पाईक म्हणून कार्य करीत आहे. मराठा क्रांती मोर्चाचा सेवाधारी म्हणून कार्य करीत आहे. तर मुस्लिम समाजाचा एक छोटासा घटक म्हणून जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अण्णाराव पाटील, मूलनिवासी वामन मेश्राम, लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे, वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री माझे आदर्श आहेत.
यावेळी मेळाव्यात प्रमुख उपस्थित होते अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,अनिरुद्ध येचले,नंदेश्वर अंबाडकर, सुरेखाताई निकाळजे संजय येंडोले गजानन महाराज झांबरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बारा राष्ट्रीय रजिस्टर राजकीय पक्ष आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या महा गटबंधनातून महालोकशाही विकास आघाडी अंतर्गत महाराष्ट्र विकास आघाडी या प्रमुख घटक पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ऍड सतीशचंद्र रोठे हे जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत विजय आपलाच त्यांचं काम मी जळून बघितलेलं आहे एकदा त्यांनी जे काम हातात घेतलं ते यशस्वी होतेच हा तीस वर्षाचा माझा अनुभव आहे. असे मत महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ऍड अनिरुद्ध येचले यांनी व्यक्त केली.
अँड सतीशचंद्र रोठेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासाठी रात्रंदिवस एक करू आणि प्रस्थापित राजकारण्यांना दाखवून देऊ सतीशचंद्र रोठे पाटील काय आहे असे मत सुरेखाताईंनी काळजी यांनी व्यक्त केले.
आपल्याला एक संघ मतदानाची आकडेवारीतून प्रस्थापितांना धक्का द्यायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य नसतांना आझाद हिंद ने गल्ली ते दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. एक खासदार आझाद हिंदचा आला तर महाराष्ट्रात नव्हे देशात आझाद हिंदच्या कार्याची गती वाढेल. त्यासाठी वारकरी तथा सर्व समाज बांधव ताकतीने कामाला लागले आहे. हभप गजानन महाराज झांबरे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
तुकोबाची पगडी आमच्यासाठी आदरणीय आहे. त्यामुळे तुकोबांची पगडी घालून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवाराचा विचार वारकरी करतील . तर तुकोबांच्या अवमान करणाऱ्या बागेश्वर धामला धडा शिकवणाऱ्या असलम शहा यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहतील असा विश्वास यावेळी ऍड रोठेंनी व्यक्त केला.
तीन तास चाललेल्या मेळाव्यात जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी राज्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.असलम शहा यांच्या उमेदवारांचे स्वागत करीत सदिच्छा दिल्या.
03/04/2024.