लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवार अंतिम

*4 उमेदवारांचे अर्ज मागे

बुलडाणा, दि. 8 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 4 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी अंतिम राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीतून विजयराज हरिभाऊ शिंदे – अपक्ष, दिपक भानुदास जाधव – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश पाटील – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

लोकसभा निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. यात गौतम किसनराव मघाडे – बसपा – हत्ती, प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना – धनुष्यबाण, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे – मशाल, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी – गॅस सिलेंडर, मच्छिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया – ऊस शेतकरी, माधवराव सखाराम बनसोडे – बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी – शिट्टी, मोहम्मद हसन इनामदार – मायनॉरिटीज डेमोक्रॅटीक पार्टी – क्रेन, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी – रोड रोलर, विकास भाई नांदवे – भिमसेना – बॅट, प्रा. सूमनताई तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक – फळांची टोपली, संतोष भिमराव इंगळे – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर – ऑटो रिक्शा, अशोक वामन हिवाळे – अपक्ष – बॅटरी टॉर्च, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष – टेबल, गजानन जर्नादन धांडे – अपक्ष – फलंदाज, दिनकर तुकाराम संबारे – अपक्ष – पेनाची नीब सात किरणांसह, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष – टीव्ही रिमोट, प्रताप पंढरीनाथ पाटील – अपक्ष – खाट, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – अपक्ष – प्रेशर कुकर, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष – स्पॅनर, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष – कढई, संदीप रामराव शेळके – अपक्ष – कॅमेरा हे चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *