उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले 167 गुन्हे

आचारसंहिता कालावधीत कारवाई

 

बुलडाणा, दि. 15 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १६७ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या १६४ वारस गुन्ह्यात १७० आरोर्पीना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ वाहनासह एकूण १८ लाख ५७ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६७२.६८ लिटर, विदेशी मद्य ८८.२ लिटर, ताडी १४८ लिटर, रसायन सडवा २ लाख ४८ हजार ५७० लिटर, हातभट्टी १ हजार ५९४ लिटर पकडण्यात आली आहे.

जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवर निमखेडी आणि हनवतखेड येथे सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सिमेपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनगाव शिवार, ता. जळगाव जामोद येथे राज्य उत्पादन शुल्कच्या खामगाव पथकाने दि. २६ मार्च २०२४ रोजी दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा टाकला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर छाप्यामध्ये १३० लिटर हातभट्टी, मोहासडवा १ हजार २०० लिटर, प्लॉस्टिक नळ्या ६ नग, पंधरा लिटरक्षमतेचे पतरी डबे ८६ नग, जर्मन घरव्या ६ नग, २० लिटर क्षमतेवे जार ५ नग. १० लिटर क्षमतेचे ३ कॅन असा ५९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आरोपी राजू नथ्थू बोबडे, वय ५५ वर्षे आणि प्रशांत रत्नाकर राऊत, दोघे रा. सुनगाव ता. जळगाव जामोद यांना अटक करण्यात आली. तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या बुलडाणा पथकाने दि. १० एप्रिल २०२४ रोजी गोतमारा शिवारातील कुऱ्हा फाटा, ता. मोताळा येथे हातभट्टी दारु ६० लिटर २ वाहनासह पकडण्यात आली. त्यात एकुण ८१ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी अनिल शिवाजी गवळी आणि सुनिल मोहनसिंग बिडवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *