कॉफी विथ रविकांत तुपकर” मध्ये अनेकांनी व्यक्त केले मत रविकांत तुपकरांनी मांडले विकासाचे विजन..

*”कॉफी विथ रविकांत तुपकर” मध्ये अनेकांनी व्यक्त केले मत रविकांत तुपकरांनी मांडले विकासाचे विजन*

बुलढाणा, (प्रतिनिधी ता.१६) – डॉक्टर, केमिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, व्यापारी, उद्योजक व शहरातील गणमान्य व्यक्तींशी रविकांत तुपकरांना थेट संवाद साधता यावा यासाठी मित्र मंडळाच्या वतीने “कॉफी विथ रविकांत तुपकर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून परिवर्तनाचा सूर दिसून आला. जिल्ह्याला सर्वसमावेशक विकासाच्या रूळावर आणण्यासाठी आता परिवर्तन गरजेचे असून रविकांत तुपकर यांच्या रूपाने आश्वासक चेहरा मिळाला आहे, त्यामुळे यावेळी निश्चितच परिवर्तन होईल, असा विश्वास या कार्यक्रमाचा दिसून आला.
बुलढाणा शहरातील मित्रपरिवाराने आज १६ एप्रिल रोजी मलकापूर रोडवरील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे सकाळी “कॉफी विथ रविकांत तुपकर” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉक्टर, केमिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, व्यापारी व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिक व मान्यवरांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी रविकांत तुपकर यांनी संवाद साधला. सर्वांच्या समस्या समजून घेतल्या. विकासाबाबतच्या सूचना, लोकप्रतिनिधी कडून असलेल्या अपेक्षांबाबत उपस्थितांचे मत जाणून घेतले. गेल्या पंधरा वर्षात बुलढाणा जिल्ह्यात एकही नवीन प्रकल्प उभा राहिला नाही, सांगता येईल असे एकही मोठे काम नाही. पंधरा वर्षाचा काळ लहान नाही या काळात अनेक प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात विकासात्मक कामांचा मोठा अभाव आहे. त्यामुळे आता विकासाचे व्हिजन असलेला आणि सर्व घटकांमध्ये समरस ठरणारा आश्वासक चेहरा म्हणून रविकांत तुपकर एक सक्षम पर्याय आहेत. जिल्ह्यात बदल घडणे आवश्यक असून तो बदल रविकांत तुपकर घडवू शकतात, असा सूर या कार्यक्रमात दिसून आला. एकंदरीत डॉक्टर, केमिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, व्यापारी उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही कल परिवर्तनाचा दिशेने असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी रविकांत तुपकर यांनी विकासाचे व्हिजन मांडले.
शेगाव, सिंदखेड राजा, लोणार, संत चोखामेळा यांचे जन्मस्थान मेहुणाराजा, बुलढाणा शहरातील ताराबाई शिंदे यांचा वाडा जिल्ह्यातील यांसह इतर धार्मिक, पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे. शेगावला विमानतळ झाल्यास विविध कंपन्या इकडे येतील आणि रोजगार वाढेल. सिंचनाचा अनुशेष दूर झाला पाहिजे, कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागातील समतोल साधणारा विकास आपल्याला अपेक्षित आहे असे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.
ज्याप्रमाणे ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे तसाच आता शहरी भागातही प्रतिसाद दिसून येत आहे,२२ वर्षात केलेल्या कामाची मजुरी म्हणून यावेळेस एक मत द्या, तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली आणि सर्वांना माझ्या “पाना” या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *