बुलडाणा पंचायत समितीचे सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी भाऊराव ओंकार बोर्डे रा- बुलडाणा यांचे आज दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी एका अल्पशा आजाराने संभाजी नगर येथे पहाटे ४ वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते ६९ वर्षाचे होते. त्यांना उपचारार्थ डॉ. बोरगावकर यांचे रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा पंचायत समिती चे गट शिक्षण अधिकारी म्हणुन त्यांनी अनेक वर्ष काम केले, प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन त्यांचा नाव लौकीक राहीला, प्राथमिक शालेय शिक्षण विभागात सकारात्मक पद्धतीने त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न व प्रो्साहन दिले, नवोदित शिक्षक व उपक्रमशील शिक्षका साठी त्यांचा पाठिंबा, मार्गदर्शन व सतत सहकार्य असायचे, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी या मध्ये चांगला सुसंवाद व समन्वय ठेऊन त्यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाचा दर्जा सुधारण्यावर सतत भर दिला, नागसेन वन औरंगाबाद येथील विद्यार्थी असल्याने त्यांचा मुळ पींड हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा होता, तो त्यांनी शेवटपर्यंत जपला, चळवळीतील वैचारिक थिंक ट्यांक म्हणुन त्यांचेकडे मार्गदर्शन मिळायचे, देऊलगाव राजा येथे त्यांनी अध्यापन कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी चिखली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणूक लढवली होती, चिखली तालुक्यातील शेळगाव आटोल येथीलमुळ रहिवाशी असलेलं भाऊराव बोर्डे दादा यांना डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या नागसेन औरंगाबाद येथील आंबेडकरी सामाजिक वारसा त्यांच्या अंगी होता, शेवट पर्यंत आंबेडकरी विचार आपल्या विचारे प्रबोधनातून त्यांनी समाजात मांडत राहीले. त्याचे पश्चात पत्नी, मुलगी व एक मुलगा ( चि. महेंद्र भाऊराव बोर्डे, सहा. अध्यापक एडेड हायस्कूल बुलढाणा) असा परिवार आहे, त्यांचा अंत्यसंस्कार आज दि.२८एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता त्रिशरण चौक बुलढाणा येथील स्मशाभूमीत होणार आहे.
तरी सर्व मित्र, नातेवाईक यांनी आपल्या परिरिने हा दु:खत संदेश द्यावा