संसार उपयोगी भांडी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व रोख मदतही दिली
घर जळालेल्या विधवा भगिनींच्या मदतीसाठी सरसावले प्रा. लहाने
संकट काळात हमखास धावून येणारी व्यक्ती म्हणजे भाऊ, बहिणीला अशा वेळी आधार असतो तो भावाचा, विधवा भगिनींचा भाऊ झालेले प्रा. डी एस लहाने हे सध्या जिल्ह्यात विधवांसाठी ‘आधार’ ठरले आहे.बिरसिंगपूर येथे घर जळालेल्या विधवा महिलेचा संसार उभा करण्यासाठी त्यांनी भांडीकुंडी दिली, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला, सोबत 11 हजाराची मदतही दिली आहे. त्या भगिणीस संकटकाळी हा मोठाच हातभार मिळाला आहे.
बिरसिंगपूर येथील उषा गजानन बोराडे गावा पासून काही अंतरावर शेतात टिनशेडमध्ये राहतात. मागील आठवड्यात शॉर्टसर्किटने त्यांच्या घराची राख रांगोळी झाली. सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाला तेव्हा गावकऱ्यांना दुर्घटना झाल्याचे कळले.त्या शेतातून घरी आल्या तेव्हा संसाराची राखच उरली होती. ही घटना समजताच प्रा.डी एस लहाने, प्रा. शाहिनाताई पठाण,डॉ. वसंतराव चिंचोले, गजानन मुळे, अनिता कापरे, ऍड. संदीप जाधव ,गौरव देशमुख व शिवसाई परिवार, मानस फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले. जाताना आवश्यक ती भांडीकुंडी व 15 हजाराचे गरजेचे साहित्य बाजारातून खरेदी केले. सोबतच 11 हजार रुपयांचा मदतही दिली.संकटकाळी प्रा.लहाने पाठिशी उभे राहिल्याचे पाहून त्या भगिनीचे डोळे पाणावले होते.
शिक्षणाची व्यवस्थाही केली
सदर विधवा महिलेस दोन आपत्य आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च प्रा. लहाने यांनी उचलला आहे. त्यांच्या शिवसाई युनिव्हर्सल मध्ये ही मुले निशुल्क शिकणार आहे.
विधवांना हक्काचा भाऊ
ल प्रा.लहाने यांनी विधवांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी सतत प्रयत्न चालवले आहे. विधवा परिषद, विधवा विवाह, शासन स्तरावर सुद्धा ते प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विधवांना त्यांच्यात हक्काचा भाऊ दिसतो आहे. दुःखात पाठीवर हात ठेवून लढ म्हणणार कोणीतरी असावं लागतं हा आधारवडच लहाने ठरत आहे.